shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

माजी सैनिकाचा सेवानिवृत्ती कार्यक्रम भावनिक वातावरणात संपन्न - देशसेवेचा गौरव मेजर सरदार

वडाळा महादेव [ वार्ताहार ] श्रीरामपूर तालुक्यातील  वडाळा महादेव येथील भारतीय सेनेतून दीर्घकाळ सेवा बजावलेल्या हवलदार प्रकाश भोंडगे यांचा सेवापूर्ती कार्यक्रम मोठ्या उत्साहात व सन्मानपूर्वक पार पडला सर्वप्रथम त्यांचे आगमन होताच आतिषबाजी करून शिवाजी चौकातील श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला त्यानंतर शिवाजी रोड येथून देशभक्तीपर गीत व रॅली काढून शहरातील शहीद स्मारकास पुष्पचक्र अर्पण करण्यात आले मेन रोड मार्गे रॅली वडाळा महादेव या ठिकाणी मार्गस्थ झाली या कार्यक्रमाचे आयोजन तालुक्यातील सर्व माजी सैनिकांच्या व भोंडगे परिवाराच्या वतीने करण्यात आले होते.


 कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावातील ज्येष्ठ नागरिक सुधीर कसार होते तर विचार मंचावर प्रमुख उपस्थितीत मेजर कृष्णा सरदार, बाळासाहेब उंडे,अनील लगड व मेजर खलाटे होते शुभेच्छापर आपल्या मनोगतात बोलताना मेजर कृष्णा सरदार म्हणाले आज प्रथमतः हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर,लोकशाहिर अण्णा भाऊ साठे यांचे स्मरण व कार्य माहिती व्हावी यासाठी त्यांच्या प्रतिमा ठेवण्यात आल्या आहेत या सर्वच महापुरुषांनी देशातील सर्वच घटकांसाठी महान कार्य केले आहेत   त्याच प्रमाणे भोंडगे यांच्या आई वडीलांचे देखील आपले दोन अपत्य भारत मातेच्या रक्षणार्थ पाठवून महान कार्य आहे व या प्रदिर्घ काळ सेवा बजावलेल्या हवलदार प्रकाश भोंडगे यांना त्यांच्या अर्धागिनींनी ने देखील सातत्याने साथ दिली आहे आणि गावातील सर्व नागरिकांनी सैनिकांच्या कार्याचा गौरव केला आहे मेजर बाळासाहेब उंडे व अनील लगड यांनी मनोगत व्यक्त करून सर्व माजी सैनिकांच्या वतीने शुभेच्छा दिल्या अनेक वक्त्यांनी माजी सैनिकांच्या शिस्त व प्रामाणिकपणा व देशभक्तीचा गौरव करत समाजासाठी असल्याचे मत व्यक्त केले  आपल्या शुभेच्छा व्यक्त करतांना सैनिक हा एक शिस्तबद्ध व्यक्ती असतो त्याने देशाची इमानेइतबारे सेवा केलेली असल्याने गावाची सुत्रे जर त्यांच्या कडे दिली तर गावं एका दोरीत चालू शकेल आपल्या मनोगतात माजी सैनिक प्रकाश भोंडगे यांनी सेवा काळातील आठवणी सांगताना केलेल्या देशसेवेचा अभिमान व्यक्त केला देशाची सेवा करण्याची संधी मला मिळाली हे माझ्या आयुष्यातील सर्वात मोठे भाग्य आहे असे भावनिक शब्द उपस्थितां समोर व्यक्त केले कार्यक्रमास पंचक्रोशीतील नागरिक, कुटुंबातील सदस्य सहकारी राजकीय शासकीय शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर तसेच तालुक्यातील असंख्य आजी माजी सैनिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते आभार श्री श्री रविशंकर विदया मंदिर शाळेचे संस्थापक अध्यक्ष संदिप कसार यांनी मानले.
close