साई दर्शनासाठी आलेल्या राष्ट्रीय पत्रकार नेत्यांचा शिर्डीत भव्य सत्कार
शिर्डी प्रतिनिधी : (तुषार महाजन)
साईबाबांच्या पवित्र नगरीत सहपरिवार साई दर्शनासाठी आलेल्या जळगाव येथील ज्येष्ठ पत्रकार तथा पुरोगामी पत्रकार संघ भारतचे राष्ट्रीय प्रमुख सल्लागार/विश्वस्त सुभाष बिंदवाल यांचा शिर्डीत अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात भव्य सत्कार करण्यात आला.
साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत आगमन झाल्यानंतर बिंदवाल यांचे सन्मानपूर्वक स्वागत करण्यात आले. समाजहिताची भूमिका जपत पत्रकारितेच्या माध्यमातून त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याचा गौरव म्हणून हा सत्कार सोहळा पार पडला.
या प्रसंगी साईबाबांचे सेवक हाजी अब्दुल बाबा यांचे वंशज गफार खान पठाण यांचे पुतणे रईस राजक पठाण यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन बिंदवाल यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या कार्याचे मनापासून कौतुक करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी पुरोगामी पत्रकार संघाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष संजय महाजन यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. सर्वांच्या उपस्थितीत हा सत्कार सोहळा अतिशय उत्साहात व स्नेहपूर्ण वातावरणात पार पडला.
सुभाष बिंदवाल यांनीही या सन्मानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत, साईबाबांच्या चरणी नतमस्तक होत समाजासाठी अधिक जोमाने कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला.
शिर्डी नगरीत अशा मान्यवरांच्या आगमनामुळे वातावरण अधिक भक्तिमय व उत्साहपूर्ण झाले असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

