भारतीय जनता पक्षाचा म्हणजेच भाजपचा आज 46 वा स्थापना दिवस आहे. 6 एप्रिल 1980 रोजी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या अध्यक्षतेखाली जनता पक्षातून बाहेर पडलेल्या लोकांनी भाजपची स्थापना केली. अटलबिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी यांनी स्थापन केलेल्या भाजपला 1984 मध्ये केवळ दोन जागा मिळाल्या होत्या. त्यानंतर त्यांनी पक्ष वाढवत 1998 मध्ये 182 जागांवर भाजपला विजय मिळवून दिला. तीन वेळा अटलजी पंतप्रधान झाले. 2014 मध्ये 282 जागा जिंकल्या आणि 2019 मध्ये जागांची संख्या 300 च्या पुढे गेली. 2024 साली पुन्हा भाजपा सरकार नरेंद्र मोदी च्या नेतृत्वाखाली तिसऱ्यांदा स्थापन झाले.
अटलजी अडवाणी चा भाजपा मोदी शाह नी जगातील एक नंबर चा पक्ष केला. भाजपा दोन खासदारा वरून बहुमताने तीन वेळा अटलजी चे सरकार नंतर मोदी शाह जोडीने पूर्ण बहुमताने तिसऱ्यादा सरकार स्थापन करित जगातील सर्वात मोठा पक्ष असे नावारूपास आणला आहे
जनसंघ ते भाजपा
जनसंघाची स्थापना २१ ऑक्टोबर १९५१ रोजी डॉ शामाप्रसाद मुखर्जी यांनी केली होती. भारतामधील हिंदूचे हित जपने ही जनसंघाची उदिष्टे होती. १९५१-५२ मध्ये झालेल्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये भारतीय जनसंघाने लोकसभेच्या तीन जागा जिंकल्या, त्यापैकी श्यामा प्रसाद मुखर्जी यांनीही एक जागा जिंकली. स्थापनेनंतर जम्मू आणि काश्मीर संपूर्ण भारतात घेतला जावा अशी भूमिका जनसंघाने घेतली दरम्यान निदर्शने करताना अटक झालेल्या मुखर्जी यांचे काश्मीर च्या तुरुंगात निधन झाले. १९६७ सालच्या देशव्यापी विधानसभा निवडणुकीत जनसंघाने अनेक लहान प्रादेशिक पक्षांसोबत युती केली व मध्य प्रदेश, बिहार व उत्तर प्रदेश राज्यांमध्ये सरकारे स्थापन केली. १९७५ साली पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी लागू केलेल्या देशव्यापी आणीबाणीला जनसंघाने कडाक्याचा विरोध केला व जनसंघाच्या अनेक सदस्यांना तुरुंगात डांबले गेले गेले. १९७७ च्या लोकसभा निवडणुकीत जनता पक्षाला प्रचंड बहुमत मिळाले. मोराराजी देसाई पंतप्रधान व अटलबिहारी वाजपेयी परराष्ट्रमंत्री झाले. परंतु अंतर्गत कलहा ने ग्रासलेले जनता पार्टी सरकार १९८० साली कोसळले व जनता पार्टीचे विघटन झाले. विघटनानंतर भारतीय जनता पार्टी स्थापन केली. अटलबिहारी वाजपेयी पहिले अध्यक्ष झाले.
भाजपा ची तत्वे
पंडित दीनदयाल उपाध्याय यांनी मांडलेले 'एकात्मता मानवता वाद ' भाजपने आपले वैचारिक तत्त्वज्ञान म्हणून स्वीकारले आहे. याशिवाय अंत्योदय, सुशासन, सांस्कृतिक राष्ट्रवाद, विकास आणि सुरक्षा यावरही पक्षाचा विशेष भर आहे. पक्षाने 'पंचनिष्ठा' नावाच्या पाच मुख्य तत्त्वांवर आपली निष्ठाही व्यक्त केली. ती तत्त्वे म्हणजे राष्ट्रवाद आणि राष्ट्रीय अखंडता, लोकशाही होय.
भाजपा स्थापनेनंतर अटलजी व मोदीजी तीन वेळा पंतप्रधान झाले. अटलजींच्या वेळी अनेक पक्षाचे सरकार सांभाळत तारेवरची कसरत करत पोखरण ची अणुबाँब चाचणी केली, पाकिस्तान बरोबर संबंध प्रस्थापित केले. कारागील युद्ध जिंकले. कवी मनाचे अटलजी यांनी अनेक कठोर निर्णय घेतले.
अटलजींनी पाहिलेले स्वप्न मोदींनी पूर्ण केले. पूर्ण बहुमताने सरकार आलेले मोदीजींनी भाजपा ने दिलेले आश्वासन पूर्ण केले. काश्मीर मध्ये एक ही रक्ताचा थेंब ही न सांडता कलम ३७० हटवले, देशात कुठंही दंगल न होता भव्य राममंदिर उभारले. तीन तलाक कायदा रद्द केला. नवीन संसद भवन बांधले, महिला विधेयक मंजूर करून महिलांना संसद व विधानसभेत आरक्षण दिले. वक्फ बोर्ड कायदा सुधारणा विधेयक मंजूर केले.
आता फक्त समान नागरी कायदा राहिला तो झाला की भाजपा ची सर्व आश्वासने पूर्ण झाली.
सामर्थ्यवान भारत सुरक्षित भारत या दृष्टिकोनातून जगाचा विरोध झुगारून पोखरण अणुचाचणी अटलजींनी केली, मोदींनी आधुनिक सुरक्षा व्यवस्था निर्माण केली. शौर्याचा विजय तिरंग्याचा महासन्मान कारगिल विजय अटलजींच्या काळात मिळवला, मोदींनी पाकिस्तान भिकेला लावला.
प्रगतीचा महामार्ग विकसित भारताचा राजमार्ग अनेक महामार्ग बनवले.
सौगंध राम की खाई है मंदिर वही बनायेंगे या घोषणेनुसार भव्य दिव्य राम मंदिर उभारणी केली.
जहाँ हुआ बलिदान मुखर्जी व कश्मीर हमारा है, एक देश दो निशाण, दो प्रधान, दो संविधान नहीं चलेगा या घोषणेनुसार 370 कलम हटवले.
हे नया भारत है या घुसकर मारते है दहशतवाद हटवला.
नारीशक्ती वंदना अधिनियम लोकसभा व विधानसभेमध्ये महिलांसाठी 33 टक्के आरक्षण दिले.
हर घर स्वदेशी, घर घर स्वदेशी, होकल फोर लोकल, मेड इन इंडिया या द्वारे स्वदेशीला चालना दिली. डिजिटल इंडिया बनवली. सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयास निर्माण केला वक्फ बोर्ड सुधारणा कायदा केला.
अमृत भारताची अत्याधुनिक रेल्वे वंदे भारत आधुनिक रेल्वे अमृत रेल्वे स्टेशन याद्वारे रेल्वे मध्ये आमूलाग्र बदल घडला.शक्ती जिद्द विज्ञान चंद्रावर भारताचे यान अटलजींनी चंद्रयान १ची मुहर्तमेढ रोवली मोदींनी चंद्रयान ३ राबवत चंद्राच्या दक्षिण टोकावर जाणारा पहिला देश केला. एक देश एक कर प्रणाली जीएसटी लागू केला. शरणार्थींना सन्मान भारताचा अभिमान दुसऱ्या देशातील हिंदूंना आसरा दिला.
हिंदवी स्वराज्याचा हुंकार छत्रपती शिवरायांचा जयजयकार म्हणत युनिस्कोच्या यादीमध्ये बारा गड किल्ल्यांचा समावेश केला. अभिजात मराठी अभिमान मराठी मराठी भाषेला राज्यभाषेचा दर्जा दिला.
भाजपा हा लोकशाही मानणारा पक्ष असून पक्षांतर्गत निवडणूक प्रक्रिया राबवली जात असून भाजपा ला या नवीन राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून कोणालाही माहीत नसणारे ४५ वर्षीय बिहारचे पाच वेळा आमदार असलेले नितीन नबीन यांची निवड झाली. बाकी सर्व पक्ष घराणे शाही चे आहेत. एकमेव भाजपा पक्ष परिवार वादी नाही. बूथ अध्यक्षा पासून राष्ट्रीय अध्यक्षा पर्यंत अतिशय पारदर्शक कारभार राबविला जातो. ऑनलाईन प्राथमिक सदस्य नोंदणीनंतर सक्रिय सदस्य नोंदणी केली जाते. त्यातून मंडल अध्यक्ष निवडला जातो. मंडल अध्यक्षासाठी ४५ वयाची अट घातली असून मंडल विधानसभेचे शंभर बूथ नुसार केले आहे. जिल्हा अध्यक्षासाठी वयाची अट ठेवली असून ५५ वय निश्चित केले आहे.
*भाजपा चे आजपर्यंत झालेले राष्ट्रीय अध्यक्ष*
१९८० अटलबिहारी वाजपेयी,
१९८६ लालकृष्ण अडवाणी,
१९९१ मुरली मनोहर जोशी,
१९९३ लालकृष्ण अडवाणी
१९९८ कुशाभाऊ ठाकरे
२००० बंगारु लक्ष्मण,
२००१ जन कृष्णामूर्ती,
२००२ व्यंकय्या नायडू,
२००४ लालकृष्ण अडवाणी ,
२००६ राजनाथ सिंह,
२००९ नितीन गडकरी,
२०१३ राजनाथ सिंह
२०१७ अमित शाह
२०२० जे.पी. नड्डा
२०२५ पासून नितीन नबीन
धन्य आहे कार्यकर्ता, त्याची शौर्य गाथा!
कमळाच्या चिन्हात आहे एक विश्वास,
भारताची शान वाढवण्याचा प्रगल्भ विचार!
त्याच्या हृदयात, त्याच्या रक्तात,
देशभक्तीचं समर्पण आहे सदैव!
चिखलातून उगवलेले कमळ पानाला चिखल लागू देत नाही तसे भाजपा कार्यकर्ता अंगाला डाग लागू देता व्रतस्थ जीवन जगतो. हेच ४६ वर्षातील समर्पित कार्यकर्त्याच्या जीवावर दोन खासदावरून तीनशे तीन खासदार, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, मंत्रिमंडळ, अनेक राज्यात मुख्यमंत्री, मंत्री, हजारो आमदार झाले आहेत. अटलजी अडवाणींची भाजपा मोदी शाह यांनी जगात एक नंबर ची पार्टी केली ती समर्पित कार्यकर्त्याच्या जीवावर च
*शब्दांकन
श्री. भाऊसाहेब वाकचौरे पाटील
जिल्हा संयोजक , भाजपा सोशल मीडिया सेल, उत्तर नगर जिल्हा
----------------------

