shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

अकोलेत पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण महा अभियानाचे उद्घाटन

अकोले प्रतिनिधी :
  "भारताला स्वातंत्र्य रक्त सांडून मिळाले असून, स्वातंत्र्यवीर सावरकर आणि नेताजी सुभाष चंद्र बोस यांनी स्वातंत्र्यासाठी प्रचंड संघर्ष केला आहे. मात्र, भारतीय संविधानाचे काँग्रेस आणि नेहरू गांधी घराण्याने खून केले आहे." भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यालय प्रभारी श्री. रवीजी आनासपुरे यांनी भारतीय स्वातंत्र्याच्या इतिहासावर महत्वपूर्ण मते व्यक्त केली.
अकोले येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण महा अभियानाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी राजूरच्या माजी सरपंच श्रीमती हेमलता पिचड होत्या. यावेळी अकोले एज्युकेशन संस्थेचे कायम विश्वस्त गिरजाजी जाधव, अध्यक्ष सुनील दातीर, सचिव सुधाकर देशमुख, जिल्हा उपाध्यक्ष यशवंत आभाळे आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

     संविधांनासाठी लढणारा भाजपा हा पक्ष आहे. काँग्रेस च्या काळात अनेक वेळा संविधान बदलवले आहे. भाजपा कार्यकर्ता सत्ता ही सेवेसाठी मानतो,भाजपा हा कार्यकर्त्यांच्या त्यागावर उभारलेला पक्ष असून पक्षातील पद ही मिरवायची नसून दायित्वाची आहेत. असेही मत रवीजी अनासपुरे यांनी व्यक्त केले.
  यावेळी  सहा सत्रात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यात आले. भारतीय जनता  युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष श्री. रोहित चौधरी यांनी वैचारिक अधिष्ठानावर भाष्य केले यावेळी सोमदास पवार हे अध्यक्षस्थानी होते. भाजपा इतिहास आणि पक्षाचा विस्तारा यावर जिल्हा महामंत्री सीताराम भांगरे यांनी मार्गदर्शन केले त्यावेळी अगस्ती साखर कारखान्याचे माजी संचालक भाऊसाहेब वाकचौरे यांनी अध्यक्षस्थान भूषवले,
बूथ व्यवस्थापन मन की बात या विषयावर जिल्हा सचिव सोनाली नाईकवाडी यांनी विचार केले माजी तालुकाध्यक्ष धनंजय संत हे अध्यक्षस्थानी होते. सोशल मीडिया आणि अन्य कार्यावर सोशल मीडिया सेल चे जिल्हा संयोजक  भाऊसाहेब वाकचौरे यांनी मार्गदर्शन केले त्यावेळी भाऊसाहेब आभाळे हे अध्यक्षस्थानी होते.
     कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अकोले मंडल अध्यक्ष राहुल देशमुख, कोतुळ मंडल अध्यक्ष बाळासाहेब सावंत, देवठाण मंडल अध्यक्ष वाल्मीक नवले, सरचिटणीस संतोष तिकांडे, प्रकाश कोरडे, माधव ठुबे आणि अशोक आवारी यांनी विशेष प्रयत्न केले.
     समारंभाची समाप्ती एक प्रेरणादायक आणि ज्ञानवर्धक कार्यशाळेच्या रूपात झाली, जिथे भाजपा कार्यकर्त्यांना पक्षाच्या इतिहास, ध्येय आणि कार्यप्रणालीच्या विविध पैलूंवर दृष्टिकोन दिले गेले.
close