shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

वाचन संस्कृतीची नवी पहाट: बिजवडी प्राथमिक आरोग्य केंद्रात ‘पुस्तकांचे पीएचसी’ कार्यान्वित

वाचन संस्कृतीची नवी पहाट: बिजवडी प्राथमिक आरोग्य केंद्रात ‘पुस्तकांचे पीएचसी’ कार्यान्वित
इंदापूर :भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त प्राथमिक आरोग्य केंद्र, बिजवडी ता. इंदापूर जि. पुणे येथे त्यांना अभिवादन करण्यात आले. या जयंतीचे औचित्य साधून सामाजिक बांधिलकी आणि वैचारिक क्रांतीचा वारसा पुढे नेत, आरोग्य केंद्राचे प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉ. गणराज चौगुले यांच्या संकल्पनेतून ‘पुस्तकांचे पीएचसी’ (PHC) या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे अनावरण करण्यात आले.
पुस्तकांच्या माध्यमातून विचारांचे अभिवादन
कार्यक्रमाची सुरुवात महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. केवळ जयंती साजरी न करता, बाबासाहेबांच्या 'शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा' या संदेशाला कृतीत आणण्यासाठी डॉ. गणराज चौगुले यांनी आरोग्य केंद्रातच रुग्णांसाठी आणि कर्मचाऱ्यांसाठी छोटेखानी ग्रंथालय अर्थात 'पुस्तकांचे पीएचसी' सुरू केले आहे.
या कार्यक्रमाचा उद्देश आरोग्य सेवेसोबतच ज्ञानवृद्धीला चालना देणे हा होता. आरोग्य केंद्रात येणाऱ्या रुग्ण व नागरिकांना वाचनाची सवय लागावी आणि आरोग्याबाबत जनजागृती व्हावी, यासाठी पुस्तकांचा उपक्रम सुरू करण्यात आला.यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे चरित्र, संविधान , श्री छत्रपती शिवाजी महाराज, राजश्री शाहू महाराज, संत तुकाराम महाराज, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले,  महान शास्त्रज्ञ डॉ. अब्दुल कलाम, स्वामी विवेकानंद आणि इतर थोर महापुरुषांच्या साहित्याचा समावेश करण्यात आला आहे.
"महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात वसलेले भिलार हे गाव 'पुस्तकांचे गाव' म्हणून जगभरात प्रसिद्ध आहे. महाबळेश्वर आणि पाचगणी यांसारख्या थंड हवेच्या ठिकाणांच्या अगदी जवळ असलेले "यशदा प्रशिक्षण केंद्र पुणे" येथे प्रशिक्षणासाठी असताना गावी भेट देऊन पुस्तकाच्या गावची संकल्पना अमलात आणण्यासाठी पी एस सी मध्ये प्रयत्न केला आहे. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी वाचनाला अनन्यसाधारण महत्त्व दिले होते. त्यांचे विचार समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचावेत आणि दवाखान्यात येणारा रुग्ण वैचारिकदृष्ट्या समृद्ध होऊन बाहेर पडावा, याच भावनेतून आम्ही ही छोटीशी ग्रंथपेढी सुरू केली आहे.शारीरिक आजारांसोबतच वाचनामुळे रुग्णांचे मानसिक आरोग्य सुधारावे आणि त्यांचा ताण कमी व्हावा, हा यामागचा मुख्य उद्देश आहे."
— डॉ. गणराज चौगुले, प्रभारी वैद्यकीय अधिकारी
या प्रसंगी वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रगती करे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या सामाजिक योगदानावर प्रकाश टाकला. त्यांनी सांगितले की, "बाबासाहेबांनी केवळ राज्यघटनाच दिली नाही, तर समता, बंधुता आणि आरोग्याविषयीचे त्यांचे विचार आजही आम्हाला प्रेरणा देतात. दीन-दलितांच्या सेवेचा जो वारसा त्यांनी दिला, तोच वारसा समोर ठेवून आरोग्य विभागाने काम करणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल." यावेळी अनेक वक्त्यांचे मनोगत आरोग्य सहाय्यक  देवेंद्र उत्तेकर,  दत्तात्रय झगडे, आरोग्य सहायिका श्रीमती कमल पांचाळ, कनिष्ठ सहाय्यक श्री प्रवीण क्षीरसागर, औषधनिर्माण अधिकारी  प्रदीप गोलांडे, आरोग्य सेविका श्रीमती. रोहिणी म्हेत्रे, श्रीमती. रिझवाना तांबोळी, श्रीमती. आशा पतंगे, श्रीमती. मनीषा दंडी, आशा गट प्रवर्तक श्रीमती. सोनाली यादव,  आरोग्य सेवक इब्राहिम मकानदार,  तानाजी कांबळे,  सुखदेव भोसले,  शामराव कांबळे,  राहुल देवकाते,  मझर मुलाणी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ  प्रतीक लोंढे, संगणक तंत्रज्ञ  अतुल तोंडे, परिचर  संदीप रायपूरे,  आनंद लांडगे,  प्रवीण पोंदकुले, वाहनचालक  शिवाजी गोळे, आशा स्वयंसेविका श्रीमती. सुवर्णा शिंदे, श्रीमती संगीता चव्हाण, श्रीमती. सुनिता वाघमारे, श्रीमती. वर्षा मुसळे, श्रीमती. पल्लवी बोराटे, श्रीमती. अश्विनी पवार, श्रीमती. वत्सला चव्हाण आणि इतर सर्व आशा स्वयंसेविका यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आत्मचरित्राला उजाळा देत "बिजवडी पुस्तकांची पी. एच. सी" बनविण्यासाठी मोलाचे सहकार्य केले.आरोग्य केंद्राच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. सहसा पांढऱ्या भिंती आणि औषधांचा वास असणाऱ्या दवाखान्यात आता ज्ञानाचा सुगंध दरवळणार आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन कथा तथा आत्मचरित्राबद्दल सखोल विचार श्री. प्रतीक लोंढे यांनी मांडले. श्री. देवेंद्र उत्तेकर, श्री. प्रवीण क्षीरसागर यांनी आभार मानले, कार्यक्रम संपला असे जाहीर केले.
close