गवांदे परिवारावर दुःखाचा डोंगर; आज सकाळी अंत्यसंस्कार
नगर प्रतिनिधी :
ताहाराबाद परिसरातील ज्येष्ठ नागरिक कै. मनोहर वामनराव गवांदे (वय ७०) यांचे मंगळवार दिनांक १४ एप्रिल २०२६ रोजी रात्री ८ वाजता हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले. त्यांच्या अकाली जाण्याने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत असून, गवांदे परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
कै. मनोहर गवांदे हे शांत, संयमी व समाजाभिमुख व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जात होते. त्यांनी आपल्या आयुष्यात अनेकांशी जिव्हाळ्याचे संबंध निर्माण केले होते. त्यांच्या निधनाने गावातील एक प्रेमळ व आदरणीय व्यक्ती हरपल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.
त्यांच्या पश्चात मुलगे, नातवंडे व मोठा परिवार असा परिवार आहे. त्यांचा अंत्यविधी बुधवार दिनांक १५ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ११ वाजता ताहाराबाद येथील स्मशानभूमीत संपन्न होणार आहे.
😔🙏🏻💐 कै. मनोहर वामनराव गवांदे यांना भावपूर्ण श्रद्धांजली...
🔸 शोकाकुल परिवार :
श्री. भुषण मनोहर गवांदे
श्री. शामकांत मधुकर गवांदे
श्री. पोपट मधुकर गवांदे
श्री. संजय प्रभाकर गवांदे
श्री. जीवन अशोकराव गवांदे
गवांदे परिवार, ताहाराबाद

