इंदापूर नगरपरिषदेत कर्मचाऱ्यांना फरकाची,उपदान (Gratuity) व रजा रोखीकरणची रक्कम नगराध्यक्ष भरत शहा यांच्या हस्ते 1कोटी 57लाख 54 हजार 840 एवढी रक्कम सुपूर्त.
वन स्ट्रोक” पद्धतीने एवढी मोठी रक्कम सुपूर्त करण्यात आल्याने कामगारांमध्ये आनंदाचे व समाधानाचे वातावरण.
इंदापूर : इंदापूर नगरपरिषदेमधील नियमित झालेले 41 कर्मचाऱ्यांना फरकाची रक्कम : ₹80,93,833
सेवानिवृत्त 8 कर्मचाऱ्यांना उपदान (Gratuity) व रजा रोखीकरण रक्कम : ₹64,06,350
सेवानिवृत्त 29 कर्मचाऱ्यांना (10/20/30 फरक)रक्कम : ₹12,49,657 अशा प्रकारे एकूण ₹1,57,54,840
या प्रसंगी मुख्याधिकारी रमेश ढगे तसेच सर्व नगरसेवक उपस्थित होते.
नगराध्यक्ष भरत शहा यांच्या नेतृत्वाखाली इंदापूर नगरपरिषदेकडून कामगारांसाठी ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला*. तसेच कामगारांनी आपल्या भावना व्यक्त करत नगराध्यक्षांचे मनःपूर्वक आभार मानले. विशेष म्हणजे, इंदापूर नगरपरिषदेच्या इतिहासात प्रथमच “वन स्ट्रोक” पद्धतीने एवढी मोठी रक्कम वितरित करण्यात आल्याने कामगारांमध्ये आनंदाचे व समाधानाचे वातावरण निर्माण झाले.

