नंदुरबार(प्रतिनिधी)-इस्माईल दगू जनसेवा फाऊंडेशनच्यावतीने सालाबादाप्रमाणे यावर्षीही शहरातील धुळे चौफुलीवरील हजरत शेरे अबुल गाजी दर्गाजवळ महान स्वतंत्र सेनानी महायोद्धा हजरत फतेहअली उर्फ शहीद टिपु सुलतान यांच्या पुण्यतिथीनिमित्त ताक वाटप करुन पाणपोईचे उद्घाटन संस्थेचे संस्थापक राज्याध्यक्ष एजाज बागवान यांच्याहस्ते करण्यात आले.
उन्हाच्या तीव्र झळा पाहता तहानलेल्यांची तहान भागविण्यासाठी पाणपोई सुरु करुन सेवा केली जात असल्याने नागरीकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे. कार्यक्रमाची सुरुवात सर्वधर्मीयांचे श्रद्धास्थान हजरत शेरे अबुल गाजी दर्गा येथे फुलांची चादर चढवून प्रार्थना करण्यात आली. इस्माईल दगू जनसेवा फाऊंडेशनतर्फे वर्षभर विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येतात. त्याचाच एक भाग म्हणून पाणपोई सेवा सुरु करण्यात आली आहे. शहरातील हिंदू-मुस्लिम बांधवांचे श्रद्धास्थान असलेल्या हजरत अबुल गाजी दर्गावर नेहमी भाविक येतात. तसेच धुळे चौफुली हा परिसर वर्दळीचा असल्याने नेहमी प्रवासी व नागरीकांची ये-जा सुरु असते. यावेळी सदा जनसेवा फाऊंडेशनचे उपाध्यक्ष ऍड.मजहर शेख, बागवान समाजाचे अध्यक्ष जाकीर बागवान, सरचिटणीस नासीर बागवान, सदा जनसेवा फाऊंडेशनचे संचालक हाजी अस्लम चौधरी, सामाजिक कार्यकर्ते सय्यद मकसुद, राष्ट्रवादी कॉंग्रेस अल्पसंख्याक विभागाचे राज्यसचिव शब्बीर शेख, इरफान खाटीक, पत्रकार जावीद अहमद, युनुस पटेल, जफर काझी, महेमुद सिकलीकर, फारुख मन्यार, जैद शेख आदी उपस्थित होते.

