रणसिंग महाविद्यालयाची क्रीडा स्पर्धेत अहिल्या शिंदे हिची आंतरराष्ट्रीय स्तरावरती झेप
इंदापूर: कळंब ता. इंदापूर येथील इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठान संचालित विश्वासराव रणसिंग महाविद्यालयातील विद्यार्थिनी अहिल्या शत्रुघ्न शिंदे हिची भारतीय कुस्ती महासंघातर्फे आंतरराष्ट्रीय स्पर्धेकरिता निवड झाली आहे.
दिल्ली येथे नुकत्याच निवड चाचणी संपन्न झाली. या मध्ये ५५ किलो वजन गटामध्ये सहभागी होत अनेक नामांकित खेळाडूंना पराभूत करीत अहिल्या हिने आपली दावेदारी सिद्ध करित आंतर राष्ट्रीय स्तरावरती आपली निवड केली.
२३ वर्षाखालील आशियाई कुस्ती स्पर्धा दि.२३ मे ते ३१ मे दरम्यान व्हिएतनाम या ठिकाणी संपन्न होणार आहेत.आंतरराष्ट्रीय स्तरावरती निवड झालेली महाविद्यालयाची अहिल्या ही पहिलीच खेळाडू ठरली आहे.
या निवडीबद्दल इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठानच्या अध्यक्षा आनंदी रणसिंग, उपाध्यक्ष प्रकाश कदम,सचिव विरसिंह रणसिंग,खजिनदार वीरबाला पाटील, विश्वस्त कुलदीप हेगडे,विश्वस्त राही रणसिंग, विश्वस्त शंकरराव रणसिंग,महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ अशोक काळंगे,शारीरिक शिक्षण संचालक डॉ सुहास भैरट यांनी अभिनंदन केले.

