shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

शुभम मोहन मुंढे यांची महसूल सहाय्यक पदी निवडगावाने वाजत गाजत काढली मिरवणूक, आमदारांच्या हस्ते झाला सन्मान

अकोले ( प्रतिनिधी ) अकोले तालुक्यातील दुर्गम आदिवासी टिटवी सारख्या  गावातील शुभम मोहनराव मुंढे यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या मार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेतून मंत्रालयीन महसूल सहाय्यक पदावर निवड झाली. या आनंद प्रित्यर्थ गावाने डी. जे. तालावर मिरवणूक काढली शुभम चा सन्मान तालुक्याचे आमदार डॉ किरण लहामटे यांच्या हस्ते  करण्यात आला.

     अकोले तालुक्यातील दुर्गम आदिवासी भागातील टिटवी येथील शुभम मुंढे याने कोणतेही प्रकारची शिकवणी न लावता हे पहिल्याच प्रयत्नात यश मिळवले आहे. त्याचे प्राथमिक शिक्षण राजूर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत तर बारावी पर्यंत चे नवोदय विद्यालय टाकळी ढोकेश्वर येथे झाले. मॅकेनिकल अभियांत्रिकी पदवी सह एम. बी. ए. चे शिक्षण पुण्यात पूर्ण केले आहे. भाजपचे माजी तालुकाध्यक्ष मोहन मुंढे यांचे चिरंजीव असून आई पुष्पा मुंढे या गृहिणी आहेत. 
     टिटवी येथे आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्ष भाजपा जिल्हा सरचिटणीस सिताराम भांगरे हे होते. यावेळी भाजपा जिल्हा सोशल मिडिया सेल जिल्हा संयोजक भाऊसाहेब वाकचौरे, मच्छिंद्र मंडलिक, रमेश राक्षे, धनंजय संत, रासपचे भगवान करवर, बाळासाहेब साबळे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन युवराज तळपे यांनी तर शेवटी आभार मोहनराव मुंढे यांनी मानले.

आदिवासी समाजातील मुले प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेऊन यश संपादन करीत आहे ही भूषणावह गोष्ट आहे.  
-आमदार डॉ किरण लहामटे

मोहन मुंढे सामाजिक चळवळीत कार्य करताना गोरगरीब आदिवासी समाजाला न्याय देण्याचे कार्य केले त्याचे फलित आहे.  शुभम ने नोकरीच्या माध्यमातून वडिलांच्या सामाजिक बांधिलकीचा वारसा पुढे न्यावा.
- सिताराम भांगरे
close