shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

बौद्ध पौर्णिमेनिमित्त भगवान गौतम बुद्धांच्या बुद्धरूपाची भव्य मिरवणूक

श्रीरामपूर / प्रतिनिधी:
श्रीरामपूर येथे २५७० व्या वेसाक (बौद्ध पौर्णिमा) निमित्त भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या बुद्धरूपाची भव्य मिरवणूक उत्साहात काढण्यात आली. या कार्यक्रमाचे नियोजन भारतीय बौद्ध महासभेचे माजी तालुकाध्यक्ष सुगंधराव इंगळे तसेच लुंबिनी बुद्ध विहार व्यवस्थापन समितीचे दादासाहेब बनकर व दिलीप सदाशिव यांनी केले.

कार्यक्रमाची सुरुवात सकाळी साडेआठ वाजता महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मानवंदना देऊन झाली. त्यानंतर सकाळी नऊ वाजता धम्मध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले.
सकाळी दहा वाजता ट्रॅक्टर- ट्रॉलीवर आकर्षक सजावट करून भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक शहरातून काढण्यात आली. मिरवणुकीत मोठ्या संख्येने बौद्ध बांधव सहभागी झाले होते.
साडेअकरा वाजता मिरवणुकीची सांगता करण्यात आली. त्यानंतर लुंबिनी बुद्ध विहार येथे त्रिशरण, पंचशील व अष्टशील ग्रहण करण्यात आले तसेच भोजनदानाचा कार्यक्रम पार पडला.
या प्रसंगी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा स्मारक समितीचे अध्यक्ष सुभाष त्रिभुवन, आंबेडकर चळवळीतील अशोक बागुल, महेंद्र त्रिभुवन, माजी नगरसेवक प्रकाश ढोकणे, रिपब्लिकन सेनेचे चरण त्रिभुवन, निलेश भालेराव, पीपल्स पार्टीचे संतोष मोकळ, गोरख आढाव, अशोक दिवे, सुरंजन साळवे, आमदार हेमंत ओगले, नगराध्यक्ष करण ससाणे,  आदींनी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमात मिलिंद कुमार साळवे,  कैलास लोखंडे, श्रीकांत मोरे, किशोर ठोकळ, सी.एस. बनकर, रावसाहेब मोहन, डी एल भोंगळे, पी.डी.सावंत, सुमन त्रिभुवन, कांता लोखंडे, अनघा त्रिभुवन, छायाताई दाभाडे, सुशीला सातदिवे, रिया त्रिभुवन, जिजाबाई पगारे, विजय शेळके, के.सी. दाभाडे, डॉ. पंडित पगारे, आकाश त्रिभुवन, सुप्रिया त्रिभुवन यांची उपस्थिती होती. तसेच कु. शुभ्रा बनकर  कु. सानवी ठोकळ या विद्यार्थिनींनी भगवान गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यावर सुंदर भाषणे केली, ज्याला उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात दाद दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सरिता सावंत यांनी केले तर आभार एल. एन. मस्के यांनी मानले.

*वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता मीडिया सर्व्हिसेस
 श्रीरामपूर 9561174111
close