shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

नेवासा फाटा येथे साईदीप करिअर पॉईंट आयोजित भव्य मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात संपन्न

प्रतिनिधी मोहन शेगर नेवासा 
अहिल्यानगर जिल्ह्यातील पवित्र श्री क्षेत्र ज्ञानेश्वर महाराज संस्थान तसेच श्री क्षेत्र देवगड संस्थान यांच्या पावन भूमीत अर्थात नेवासा फाटा येथे साईदीप करिअर पॉईंट आयोजित “1st भव्य मॅरेथॉन स्पर्धा 2026” उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. ही स्पर्धा दिनांक ५ मे २०२६ रोजी सकाळी ६ ते ९ या वेळेत आयोजित करण्यात आली होती.

“चला धावूया... आरोग्यासाठी, उज्ज्वल भविष्यासाठी!” ही मॅरेथॉनची 2026 ची मुख्य थीम होती. स्पर्धेमध्ये 7 ते 14 वर्षे, 15 ते 18 वर्षे तसेच 18 ते 30 वर्षे या वयोगटातील मुला-मुलींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. ग्रामीण भागातील युवकांमध्ये आरोग्य जागरूकता, क्रीडा संस्कृती आणि स्पर्धात्मक वृत्ती वाढीस लागावी या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
स्पर्धेचा शुभारंभ खडेश्वरी संस्थांचे मठाधिपती ह.भ.प. गणेशानंदगिरी महाराज यांच्या हस्ते करण्यात आला. तर बक्षीस वितरण समारंभाचे अध्यक्षस्थान मा. श्री. अंकुश काळे पाटील (जिल्हाध्यक्ष, भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा) यांनी भूषविले.
कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून मुकिंदपूरचे सरपंच श्री. दादाजी निपुंगे, श्री. गणेश लंघे पाटील, श्री. मुकुंद काळे पाटील, श्री. रामचंद्र निंबाळकर, श्री. मच्छिंद्र विधाटे, श्री. नवनाथ गायके तसेच श्री. संभाजी जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
या भव्य मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन साईदीप करिअर पॉईंटचे संस्थापक प्रा. साईनाथ गायके तसेच मॅरेथॉन रनर एस. एन. पांडे यांनी केले होते. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात प्रा. साईनाथ गायके यांनी उपस्थित सर्व स्पर्धक, मान्यवर व नागरिकांचे स्वागत करत ग्रामीण भागातील युवकांमध्ये आरोग्याविषयी जागरूकता निर्माण होणे आणि अशा उपक्रमांतून सकारात्मक संदेश समाजात पोहोचणे गरजेचे असल्याचे सांगितले.
या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी राजगिरे फिटनेस क्लब तसेच त्रिमूर्ती कॉलेजच्या क्रीडा शिक्षकांनी विशेष सहकार्य केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात श्री. अंकुश काळे पाटील यांनी आयोजक समितीचे कौतुक करत विजेत्या स्पर्धकांचे अभिनंदन केले. तसेच पुढील वर्षीही अशाच भव्य स्वरूपात मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन व्हावे, अशा शुभेच्छा दिल्या.

close