shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

सामाजिक कार्यकर्ते व युवा नेते साई रामजी गागरे यांचा वाढदिवसानिमित्त मान्यवरांच्या हस्ते सत्कार



शिर्डी शहरातील सामाजिक कार्यात सक्रिय योगदान देणाऱ्या साई गागरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छांचा वर्षाव

शिर्डी प्रतिनिधी : 
शिर्डी शहरातील सामाजिक कार्यात नेहमीच सक्रिय राहणारे, युवकांमध्ये लोकप्रिय असलेले सामाजिक कार्यकर्ते व युवा नेते साई रामजी गागरे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी साई गागरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभाशीर्वाद दिले.
साई रामजी गागरे हे शिर्डी परिसरात सामाजिक उपक्रम, जनसंपर्क व नागरिकांच्या प्रश्नांवर सातत्याने कार्यरत असलेले युवा नेतृत्व म्हणून ओळखले जातात. त्यांच्या वाढदिवसानिमित्त विविध मान्यवरांनी त्यांची भेट घेऊन त्यांना सत्कार केले. समाजासाठी चांगले काम करणाऱ्या तरुण नेतृत्वाला प्रोत्साहन देणे ही काळाची गरज असल्याचे मत यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.
या सत्कार प्रसंगी शिर्डी विविध कार्यकारी सोसायटीचे माजी चेअरमन आप्पासाहेब तुकाराम कोते, सामाजिक कार्यकर्ते व चोपदार नवनाथजी थोरे, तसेच पत्रकार संजय महाजन आदी मान्यवर उपस्थित होते. उपस्थितांनी साई रामजी गागरे यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक करत त्यांना भविष्यात आणखी मोठ्या जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडाव्यात, अशा शुभेच्छा दिल्या.
युवा पिढीने समाजकारणात पुढे येऊन नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी कार्य करणे आवश्यक आहे. साई रामजी गागरे यांसारखे तरुण सामाजिक कार्यकर्ते समाजासाठी प्रेरणादायी ठरत असल्याचेही यावेळी बोलताना मान्यवरांनी सांगितले.

वाढदिवसानिमित्त झालेला हा सत्कार सोहळा अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. साई रामजी गागरे यांनी सर्व मान्यवरांचे आभार मानत समाजसेवेचे कार्य पुढेही अधिक जोमाने सुरू ठेवण्याचा संकल्प व्यक्त केला.
close