ग्रीन फाउंडेशन महाराष्ट्र राज्यतर्फे वृक्षारोपण, पक्ष्यांना धान्य-पाणी व निसर्ग श्रमदान उपक्रम; निसर्गप्रेमींना उपस्थित राहण्याचे आवाहन
नगर प्रतिनिधी :
ग्रीन फाउंडेशन महाराष्ट्र राज्यच्या वतीने आदर्श पत्रकार श्री. संजय विठ्ठल महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक आणि पर्यावरणपूरक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार, दिनांक ९ मे २०२६ रोजी सकाळी १० वाजता लोणी काळभोर गाव येथे हे उपक्रम उत्साहात पार पडणार आहेत.
या उपक्रमांतर्गत वृक्षारोपण, पक्ष्यांना धान्य व पाणी ठेवणे तसेच निसर्ग श्रमदान असे विविध सामाजिक कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत. वाढदिवस केवळ केक कापून साजरा न करता समाजोपयोगी आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणाऱ्या उपक्रमातून साजरा करण्याचा सुंदर आदर्श ग्रीन फाउंडेशनकडून केले जात आहे.
आज वाढते तापमान, कमी होत चाललेली झाडे आणि पक्ष्यांसाठी पाणी-धान्याची निर्माण होणारी अडचण लक्षात घेता असे उपक्रम काळाची गरज बनले आहेत. वृक्षारोपणातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला जाणार असून, पक्ष्यांसाठी धान्य व पाण्याची व्यवस्था करून मुक्या जीवांप्रती संवेदनशीलता जपली जाणार आहे. तसेच निसर्ग श्रमदानाच्या माध्यमातून स्वच्छता, पर्यावरण जपणूक आणि सामाजिक बांधिलकी यांचा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
या कार्यक्रमास ग्रीन फाउंडेशनचे सर्व सभासद, निसर्गप्रेमी, पदाधिकारी तसेच विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून फाउंडेशनशी जोडलेले नागरिक यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन टीम ग्रीन फाउंडेशन महाराष्ट्र राज्यच्या वतीने करण्यात आले आहे.
कार्यक्रमाची माहिती :
वार : शनिवार
दिनांक : ९ मे २०२६
वेळ : सकाळी १० वाजता
स्थळ : लोणी काळभोर गाव
“वसा समाजकार्याचा” हे ब्रीद घेऊन ग्रीन फाउंडेशन महाराष्ट्र राज्य सातत्याने समाजहित आणि पर्यावरण संवर्धनासाठी कार्यरत असून, या उपक्रमातून वाढदिवसाला सामाजिक सेवेची सुंदर जोड मिळणार आहे.

