shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

साई संस्थान सुरक्षा रक्षकाची प्रामाणिकता; सापडलेली चांदीची अंगठी संरक्षण विभागात जमा



नवीन संकुल परिसरात सापडलेली अंगठी जमा; सुरक्षा रक्षक विजय पारधे यांचा सत्कार

शिर्डी प्रतिनिधी: ( तुषार महाजन )
आज दिनांक 04/06/2026 रोजी श्री साईबाबा संस्थानच्या नवीन संकुल परिसरामध्ये नियमित राऊंड घेत असताना सुरक्षा रक्षक श्री. विजय पारधे यांना एक चांदीची अंगठी सापडली.
सदर अंगठी स्वतःकडे न ठेवता त्यांनी प्रामाणिकपणे संरक्षण विभागात जमा केली. त्यांच्या या प्रामाणिक व जबाबदार कृतीची दखल घेत सुरक्षा अधिकारी यांनी सुरक्षा रक्षक विजय पारधे यांचा सत्कार केला.

श्री.पारधे यांच्या या प्रामाणिकतेमुळे सुरक्षा विभागातील कर्तव्यनिष्ठा आणि साईभक्तांच्या वस्तूंबाबत दाखवली जाणारी जबाबदारी पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. त्यांच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
close