shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

अगस्ती महाराज यांनी दक्षिणेतील पहिला आश्रम अकोल्यात स्थापन केला - गोविंददेव गिरी महाराजअकोले येथे अधिकमासात प्रवचन सोहळा

अकोले ( प्रतिनिधी)अकोल्याची भूमी असामान्य असून दक्षिणेतील पहिला आश्रम येथे स्थापन केला. या आश्रमात त्यांनी प्रभू श्रीराम यांना शस्त्र आगर दाखवले, रावणाला मारण्यासाठी बाण दिला. राक्षसांचा विनाश करण्यात या आश्रमाचे महत्व आहे. असे प्रतिपादन श्रीराम मंदिर ट्रस्ट अयोध्या चे कोषाध्यक्ष स्वामी गुरु गोविंददेव गिरीजी महाराज यांनी केले. 

       अकोले येथील अगस्ती आश्रमात पुरुषोत्तम अधिक मास निमित्ताने महिनाभर अखंड कीर्तनमोहत्सव आयोजित करण्यात आला यामध्ये गोविंददेवगिरीजी महाराज बोलत होते. यावेळी आमदार किरण लहामटे, अगस्ती देवस्थान ट्रस्ट चे अध्यक्ष ॲड के. डी. धुमाळ, प्राचार्य डॉ अनिल सहस्रबुद्धे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे उत्तर नगर जिल्हा कार्यवाह दिपक जोंधळे,   आदी उपस्थित होते.
भारत राष्ट्र हे धर्माच्या आधारावर आधारित राष्ट्र असून सनातन धर्माचा पाया आपला देश आहे. सनातन धर्म समानतेचा आहे. याच्यासाठी आपण जीवन समर्पित करावे. इच्छा शक्ती असेल तर प्रभू श्रीराम यांचे मंदिर भव्य दिव्य उभारण्यात आले.
     अगस्ती महाराज यांचे दहा पुत्र राक्षसांनी मारले यामुळे त्यांचा विनाश करण्याचे नियोजन केले. यासाठी अनेक आश्रम स्थापन केले. अकोलेत अगस्ती महाराज लोपमुद्रा मातेसह राहिले यामुळे ही भूमी पवित्र आहे. आदित्य स्तोत्राची निर्मिती केली त्याचा महिमा आजही आहे असेही मत त्यांनी व्यक्त केले.
     अमृतवाहिनी प्रवरा माता ही अत्यंत पवित्र असून तिच्या तीरावर अकोल्यात अगस्ती आश्रम व नेवासा येथे ज्ञानेश्वरी चे लिखाण झाले आहे. गोदावरी स्नान व प्रवरा पान म्हणजे प्रवरा नदीचे पाणी पिणे कारण ते शुद्ध असून औषधी जल आहे अशीही माहिती दिली. प्रवरेच्या तीरावरील आपण सर्व बंधू आहोत. असेही महाराज यांनी म्हटले.
     अकोले मतदारसंघाचे आमदार किरण लहामटे यांनी मला मनाला समाधान मिळावे यासाठी मी आठवड्यातून दोन तीन वेळा दर्शनासाठी येतो. अगस्ती देवस्थानचा विकास करण्यासाठी सर्वोत्परी प्रयत्न करू अशी ग्वाही दिली.
     अगस्ती देवस्थानचे अध्यक्ष ॲड के. डी. धुमाळ यांनी प्रभू श्रीराम कॉरिडॉर मध्ये अगस्ती देवस्थानचा चा समावेश करून देवस्थान चा विकास करावा यासाठी गुरू गोविंद गिरीजी महाराज यांनी प्रयत्न करावे अशी मागणी केली.
 अयोध्येतील प्रभू श्रीराम यांचे मंदिरात अगस्ती महाराज यांची मूर्ती बसवली  तिची प्रतिकृती अकोले आश्रमातील मूर्तीसारखी गुरू गोविंददेवगिरीजी महाराज यांनी बनवली. हा अगस्ती आश्रमाचा गौरव आहे असे मत दिपक महाराज देशमुख यांनी व्यक्त केले.
    प्रवरा पुलावर प्रवरा मातेचे पूजन करण्यात आली. अगस्ती महाराज गुरुकुल च्या विद्यार्थ्यांनी संकेत महाराज आरोटे यांच्या मार्गदर्शनाखाली टाळ मृदुंगाच्या गजरात मिरवणूक काढली.

 अगस्ती महाराज यांचे दर्शन हे माझे महत भाग्य आहे.

रामायणात प्रभू श्रीराम यांचे नावाने पाषाण पाण्यावर तरंगत होते. जय श्रीराम यांचे घोषणेने बंगाल जिंकले हा रामनामा चा महिमा आहे... गोविंदगिरीजी महाराज
close