जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गौराई मळा येथे दिनांक 16 जुलै 2026 रोजी बाल दिंडी पालखी सोहळा अत्यंत भक्तीमय आणि उत्साह पूर्ण.
इंदापूर: जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गौराई मळा येथे दिनांक 16 जुलै 2026 रोजी बाल दिंडी पालखी सोहळा अत्यंत भक्तीमय आणि उत्साह पूर्ण वातावरणात संपन्न झाला. ग्रामपंचायत सदस्य सौ. अश्विनीताई शिंगाडे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री सुरेश नामदेव शिंगाडे तंटामुक्तीचे अध्यक्ष श्री तात्यासाहेब शिंगाडे यांच्या हस्ते पालखी पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली कार्यक्रमाचे प्रस्ताविक मुख्याध्यापक श्री अशोक क्षीरसागर यांनी केले . यानंतर परिसरातून पालखी दिंडी सोहळा फेरीचे आयोजन करण्यात आले.या पालखी सोहळ्याला गावातील लोकांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला.या बाल दिंडीचे आयोजन विद्यार्थ्यांमध्ये वारकरी संप्रदायाची परंपरा, संतांचे विचार ,भक्ती संस्कार, पर्यावरण संवर्धन ,सामाजिक एकता आणि भारतीय संस्कृतीची जपणूक याविषयी जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने करण्यात आले.या पालखी सोहळ्यानिमित्त विद्यार्थ्यांनी विठ्ठल रखुमाई व विविध संतांची वेशभूषा केली होती. या कार्यक्रमासाठी श्री विलास शिंगाडे, सौ.शांताबाई जाधव, सौ. अश्विनी शिंगाडे सौ. मेघा नाझरकर सौ अनुराधा शिंगाडे , श्री सचिन शिंगाडे, मल्हारी जाधव, श्री भगवान जाधव,सौ रुपाली पवार मॅडम,उपशिक्षीका सौ.सुवर्णा क्षीरसागर मॅडम,अंगणवाडी सेविका सौ. सुनीता जाधव मॅडम व ग्रामस्थ उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी सौ रुपाली पवार मॅडम व श्री संतोष पवार यांनी छोट्या वारकऱ्यांसाठी वडापाव,शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुरेश शिंगाडे यांनी शेव चिवडा,श्री पंकज भोंग यांनी शेंगदाणा लाडू,श्री भगवान जाधव यांनी खाऊसाठी शंभर रुपये व शाळेने जिलेबीचे वाटप केले.कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळा व्यवस्थापन समिती पालक ग्रामस्थ आणि सर्व शिक्षकांचे मोलाचे सहकार्य लाभले त्यामुळे हा पालखी सोहळा अत्यंत उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडला.
- मुख्यपान
- 🎌 महाराष्ट्र
- _अहमदनगर
- __शिर्डी
- _पुणे
- _जालना
- _सांगली
- _नांदेड
- _नंदुरबार
- _गडचिरोली
- _कोल्हापूर
- _सातारा
- _गोंदिया
- _रत्नागिरी
- _रायगड
- _जळगाव
- _अमरावती
- _सिंधुदुर्ग
- _बीड
- _लातूर
- _नाशिक
- _नागपूर
- _सोलापूर
- _औरंगाबाद
- _हिंगोली
- ♻ ताज्या बातम्या
- 🌍 देशविदेश
- _पर्यावरण
- 🎭 मनोरंजन
- _लाइफस्टाइल
- _योग
- _जोतिष
- __वास्तुसल्ला
- _अभंग
- _कविता
- __नारायणास्त्र
- __ग्रामीण कडे
- __" कर्तव्यदक्ष पोलीस"
- __आई म्हणजे
- __खरं प्रेम
- __भाकर
- __आंनदी जत्रा
- __कोरोना
- __आठवडा ..
- ⚕️ आरोग्य
- _केस गळती
- _रोगप्रतिकारक शक्ती
- 👨🌾कृषिवार्ता
- शैक्षणिक
- _भरती
- _पुरस्कार
- _📲 App

