shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

श्री संत सोपानकाका महाराज पालखी सोहळ्याचे लाखेवाडीत उत्साहात स्वागत.

श्री संत सोपानकाका महाराज पालखी सोहळ्याचे लाखेवाडीत उत्साहात स्वागत.
इंदापूर : 

चला हो पंढरीसी जाऊ | जीवाच्या जिवलगा पाहू ||..

 पंढरीच्या वाटेवरती आषाढी एकादशीला विठ्ठल रूखमाई च्या भेटीला संत ज्ञानेश्वर माऊली, संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या पंढरीच्या दिशेने निघाले असून लाखो वारकरी वैष्णव पंढरीच्या पांडुरंगाला पाहण्यासाठी या पालख्यांबरोबर निघाले असून  आज श्री संत सोपानकाका पालखी मार्गक्रमण करत  दिनांक 20 जुलै रोजी निरवांगी येथील मुक्कामानंतर  लाखेवाडी येथे दाखल झाली.
  लाखेवाडी येथील ग्रामस्थ व भजनी मंडळ यांच्या वतीने ज्ञानोबा तुकोबा सोपान काका यांच्या नामघोष करीत   उत्साहात स्वागत करण्यात आले. यावेळी शालेय विद्यार्थ्यांनी ढोल ताशा वाजवत तसेच लेझीम नृत्य करीत पालखीचे अनोख्या पद्धतीने स्वागत केले . यावेळी आयुक्त दिलीप ढोले यांनी रथाचे सारथ्य केले 
 याप्रसंगी   अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले, जिल्हा परिषदेचे गटनेते श्रीमंत ढोले, लाखेवाडीच्या सरपंच चित्रलेखा ढोले, जय भवानी गड विकास प्रतिष्ठानचे सचिव हर्षवर्धन खाडे, समस्त ग्रामस्थ भजनी मंडळ उपस्थित होते.
पालखी विसाव्याठिकाणी दाखल झाल्यानंतर भाविक भक्तांनी रांगेत काकांच्या पालखीचे दर्शन घेतले. यावेळी आरोग्य विभाग जिल्हा परिषद पुणे यांच्या वतीने वारकऱ्यांना आरोग्य किट वाटप पुणे जिल्हा परिषदेचे गटनेते श्रीमंत ढोले व संत सोपानकाका महाराज पालखी सोहळ्याचे प्रमुख त्रिगुण गोसावी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आरोग्य केंद्राचे डॉक्टर तसेच इतर आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.
संत सोपानकाका महाराज पालखी सोहळ्याचे प्रमुख त्रिगुण गोसावी व त्यांच्या विश्वस्तांचे ढोले परिवाराच्या वतीने सन्मान करण्यात आला.
----------------------
संतांचिया पायी हा माझा विश्वास । सर्वभावे दास झालो त्यांचा ।।
याप्रमाणे लाखेवाडी येथील ग्रामस्थ श्री संत सोपान काका पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांची सेवा अन्नदान रूपाने  भक्तीमय भावाने करीत असताना दिसून आले.
-----------------------------
फोटो ओळ: श्री संत सोपानकाका महाराज पालखी सोहळ्याचे स्वागत करताना.
close