shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

संत तुकाराम महाराज पालखी मार्गावर विद्यार्थींचे"सेवा,श्रद्धा आणि भक्तीचे अभियान..

*"संत तुकाराम महाराज पालखी मार्गावर विद्यार्थींचे"सेवा,श्रद्धा आणि भक्तीचे अभियान..!*
इंदापूर: दि. ९ जून २०२६ रोजी वारकरी परंपरेच्या पवित्र पालखी मार्गावरील बोपोडी या ठिकाणी संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या पालखीच्या पायीवारी वारकऱ्यांच्या सेवेसाठी खडकी शिक्षण संस्थेच्या टिकाराम जगन्नाथ पायात महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागा वतीने खास उपक्रम राबविला गेला. या कार्यक्रमात महाविद्यालयातील विद्यार्थी आणि विविध शाखांमधील प्राध्यापकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. याप्रसंगी वारकऱ्यांना जवळपास दहा हजार वारकरी टोपींचे वाटप झाले. विद्यार्थ्यांनी उत्साहाने व आदरभावनेने वारकऱ्यांना टोपी घालून सन्मान केला.पालखी मार्गावरील श्रमदानातून स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. विद्यार्थी, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी,सेवकवर्गाने पालखी पायवारी रस्त्याची स्वच्छता केली; कचरा संकलन, प्लास्टिक वेगळे करणे आणि आवश्यक जागांवर कचरा निवार्णासाठी जागरूकता करणे, अशापद्धतीने श्रमदानातून पालखी मार्गावरील तसेच परिसराची स्वच्छता राखली. या अनुषंगाने संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. कृष्णकुमारजी गोयल, सचिव मा. श्री. आनंदजी छाजेड, सहसचिव तसेच प्राचार्य डॉ. संजय चाकणे यांची या सेवा भावनेच्या उपक्रमातील उपस्थिती मार्गदर्शक ठरले. *मा.श्री.कृष्णकुमार गोयल* यांनी संस्थेच्या वतीने विद्यार्थ्यांच्या  सेवा भावनेचे कौतुक करताना म्हणाले, *"सेवा ही केवळ हाताची कामगिरी नसून हृदयाची उपासना आहे".* तर संस्थेचे सचिव *मा.श्री.आनंद छाजेड* यांनी *"वारकऱ्यांची सेवा ही,मानवी कल्याणाची साधना आहे".* असे मत व्यक्त केले.*सहसचिव तथा प्राचार्य डॉ. संजय चाकणे* यांनी सेवार्थी विद्यार्थ्यांच्या प्रयत्नांचे मनापासून कौतुक करत विद्यार्थ्यांच्या आचार-विचार, नैतिकता व आत्मबलाच्या दृष्टीने संतांची जीवनदृष्टी आणि आध्यात्मिक कार्य विद्यार्थ्यांमध्ये व्यक्त करताना म्हणाले,
*"प्रत्येक सेवा ही अंतर्मनाला समाधान देण्याचा आधार आहे आहे"*
   या कार्यक्रमात परिसरातील नगरसेविका सौ.सपना छाजेड, आमदार श्री. सिद्धार्थ शिरोळे तसेच इतर सामाजिक-राजकीय कार्यकर्ते हे देखील उपस्थित होते. महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी डॉ. अविनाश कोल्हे,प्रा. अर्चना तारू प्रा. संदीप भागीत यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले तर खडकी छावणी परिषदेचे सहकारी मुलाचे ठरले. सर्व प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व सेवक यांचाही सहभाग उत्साहवर्धक ठरला. विद्यार्थींनी त्यांच्या सेवाभावी कार्यातून वारकऱ्यांचा सन्मान केला. याप्रसंगी खडकी शिक्षण संस्थेची,टिकाराम जगन्नाथ वरिष्ठ महाविद्यालयाची सामाजिक बांधिलकीची सेवाभावी प्रतिमा दृढ झाली.
close