सदिच्छा भेटीतून महारुद्र स्पोर्टस् & करिअर अकॅडमीच्या कार्याचा गौरव
इंदापूर :महारुद्र स्पोर्टस् & करिअर अकॅडमी, पळसदेव (ता. इंदापूर, जि. पुणे) येथे सह्याद्री करिअर अकॅडमी बारामतीचे संस्थापक अध्यक्ष . उमेश रुपनवर तसेच सौ. रुपनवर मॅडम यांनी सदिच्छा भेट देऊन अकॅडमीच्या विविध उपक्रमांची नुकतीच पाहणी केली.
यावेळी महारुद्र स्पोर्टस् & करिअर अकॅडमीचे संस्थापक अध्यक्ष सतीश बनसुडे यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करून अकॅडमीच्या कार्याचा व भविष्यातील उपक्रमांचा सविस्तर परिचय करून दिला.
यावेळी अकॅडमीमध्ये सुरू असलेले पोलीस भरती, सैन्य भरती, विविध स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन तसेच सर्व क्रीडा प्रकारांचे प्रशिक्षण याबाबत त्यांनी सविस्तर माहिती घेत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी उभारण्यात आलेल्या या उपक्रमाचे त्यांनी विशेष कौतुक करत अकॅडमीच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी महाराष्ट्रभर लोकप्रिय असलेले सह्याद्री करिअरचे प्रसिद्ध मार्गदर्शन पुस्तक ‘सह्याद्रीचा ठोकळा’ (सात बुक) हे उमेश रुपनवर यांनी महारुद्र स्पोर्टस् & करिअर अकॅडमीचे संस्थापक अध्यक्ष सतीश बनसुडे यांच्याकडे अकॅडमीस भेट म्हणून सुपूर्द केले. विद्यार्थ्यांच्या स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी हे पुस्तक अत्यंत उपयुक्त ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमास अकॅडमीचे सल्लागार सुहास माने व नितीन बनसुडे , तसेच अकॅडमीचे लेक्चरर प्रा. सुधीर करगळ हे उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना यशस्वी करिअरसाठी प्रेरणादायी मार्गदर्शन केले.
महारुद्र स्पोर्टस् & करिअर अकॅडमीच्या वतीने संस्थापक अध्यक्ष सतीश बनसुडे यांच्या हस्ते सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. त्यांच्या भेटीमुळे विद्यार्थ्यांमध्ये नवी उमेद, प्रेरणा आणि आत्मविश्वास निर्माण झाला असून अकॅडमीच्या पुढील वाटचालीस नवे बळ मिळाले आहे.
शेवटी महारुद्र स्पोर्टस् & करिअर अकॅडमीचे संस्थापक अध्यक्ष सतीश बनसुडे यांनी उमेश रुपनवर , सौ. रुपनवर मॅडम, मा. सुहासदादा माने, नितीन बनसुडे आणि प्रा. सुधीर करगळ यांचे सदिच्छा भेटीबद्दल मनःपूर्वक हार्दिक आभार व्यक्त केले.

