shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

आयएमए इंदापूरच्या नूतन अध्यक्षपदी डॉ. अभिजित ठोंबरे तर सचिवपदी डॉ. अतुल वणवे यांची निवड.राष्ट्रीय डॉक्टर्स डे निमित्त ज्येष्ठ डॉक्टरांचा सन्मान .

आयएमए इंदापूरच्या नूतन अध्यक्षपदी डॉ. अभिजित ठोंबरे तर  सचिवपदी डॉ. अतुल वणवे यांची निवड.

राष्ट्रीय डॉक्टर्स डे निमित्त ज्येष्ठ डॉक्टरांचा सन्मान .
इंदापूर : इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) इंदापूर शाखेच्या वतीने १ जुलै रोजी डॉ. नीतू मांडके आयएमए हाऊस येथे राष्ट्रीय डॉक्टर्स डे उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या ज्येष्ठ डॉक्टरांचा सन्मान करण्यात आला. तसेच डॉ. अभिजित ठोंबरे यांच्या अध्यक्षतेखाली आयएमए इंदापूरच्या नूतन संचालक मंडळाची घोषणा करण्यात आली. राज्य आयएमएचे माजी अध्यक्ष डॉ. राम अरणकर यांच्या मार्गदर्शनाखाली नव्या कार्यकारिणीची निवड करण्यात आली असून, अध्यक्ष डॉ. अभिजित ठोंबरे व सचिव डॉ. अतुल वणवे यांच्याकडे पदभाराची अधिकृत पत्रे सुपूर्द करण्यात आली.

दरम्यान, ३ जुलै रोजी माजी संसदीय कार्यमंत्री तथा राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते 'भाग्यश्री' निवासस्थानी नूतन संचालक मंडळाचा सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांनी सर्व सदस्यांना 'विधान गाथा' हे पुस्तक भेट देत पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. कोरोना काळानंतर आरोग्य क्षेत्रासमोरील आव्हाने वाढली असून, ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यात आयएमएची भूमिका महत्त्वाची असल्याचे त्यांनी सांगितले.

नवनियुक्त अध्यक्ष डॉ. अभिजित ठोंबरे यांनी आयएमएच्या माध्यमातून तालुक्यात मोफत आरोग्य शिबिरे व विविध सामाजिक उपक्रम सातत्याने राबविण्याची ग्वाही दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. अनिल शिर्के यांनी केले, सूत्रसंचालन डॉ. ऋषिकेश गार्डे यांनी केले, तर आभार डॉ. सुधीर तांबिले यांनी मानले. आयएमए इंदापूरचा अधिकृत पदग्रहण सोहळा २ ऑगस्ट रोजी डॉ. नीतू मांडके आयएमए हाऊस येथे होणार आहे.
close