shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

रोटरी क्लब ऑफ इंदापूरचा पदग्रहण समारंभ संपन्न. अध्यक्षपद भीमाशंकर जाधव यांच्याकडे तर सचिवपदी उदय शहा तर खजिनदारपदी सुहास राऊत यांची निवड.नवनियुक्त रोटरियन यांचा समाजहिताच्या उपक्रमांना अधिक गती देण्याचा निर्धार

रोटरी क्लब ऑफ इंदापूरचा पदग्रहण समारंभ संपन्न. 

   अध्यक्षपद भीमाशंकर जाधव यांच्याकडे तर सचिवपदी  उदय शहा तर खजिनदारपदी सुहास राऊत यांची निवड.

नवनियुक्त रोटरियन यांचा समाजहिताच्या उपक्रमांना अधिक गती देण्याचा निर्धार
इंदापूर : रोटरी क्लब ऑफ इंदापूरच्या सन २०२६-२७ या वर्षासाठीच्या नव्या कार्यकारिणीचा पदग्रहण समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. अध्यक्ष रो.भीमाशंकर जाधव, सचिव रो. उदय शहा व खजिनदार म्हणून रो.सुहास राऊत यांनी पदभार स्वीकारला.
    समारंभाच्या अध्यक्षस्थानी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर  नितीन ढमाले होते. असिस्टंट गव्हर्नर रो. रणजित भोंगळे या समारंभाचे प्रमुख पाहुणे होते.रोटरी क्लब ऑफ इंदापूरचे संस्थापक अध्यक्ष रो.प्रदीप गारटकर, मावळते अध्यक्ष रो. नितीन शहा, मावळते खजिनदार रो. मनोहर बेद्रे यांच्या उपस्थितीत हा समारंभ संपन्न झाला.
    मावळते अध्यक्ष रो. नितीन शहा यांनी प्रास्ताविक करत,आपल्या कार्यकाळात राबविण्यात आलेल्या विविध सामाजिक व सेवाभावी उपक्रमांचा आढावा घेतला. नवनिर्वाचित अध्यक्ष रो. भीमाशंकर जाधव यांनी आगामी वर्षात आरोग्य, शिक्षण, पर्यावरण, युवक विकास व सामाजिक बांधिलकी जपणारे विविध उपक्रम राबविण्याचा संकल्प व्यक्त केला.
    डिस्ट्रिक्ट गव्हर्नर नितीन ढमाले यांनी रोटरी इंटरनॅशनलच्या माध्यमातून जिल्हाभरात सुरू असलेल्या सेवा प्रकल्पांची माहिती देत समाजहितासाठी अधिक प्रभावी काम करण्याचे आवाहन केले. संस्थापक अध्यक्ष रो. प्रदीप  गारटकर यांनी रोटरीची जागतिक व्याप्ती, सेवाभावी परंपरा, राजकारणापलीकडे जाऊन समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी संस्था सातत्याने कार्यरत असल्याचे सांगितले.

याप्रसंगी सर्विस प्रोजेक्ट डायरेक्टर रो. वसंत माळुंजकर यांनी आगामी प्रकल्पा बद्दल माहिती दिली.
    या कार्यक्रमास विविध क्षेत्रांतील मान्यवर, उद्योजक, सामाजिक कार्यकर्ते व रोटरी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
    रो. नरेंद्र गांधी, रो. संजय दोशी, रो. आझाद पटेल, रो. नंदकुमार गुजर, रो. पारसमल बगरेचा, रो. प्रमोद भंडारी, रो. पद्मसिंह जाधव, रो. अमर गायकवाड, रो. दीपक झालटे पाटील, रो. धर्मचंद लोढा, रो. डॉ. यतीन शिंदे, रो. दत्तात्रय व्यवहारे, रो. राजेंद्र जगताप, रो. अजिंक्य इजगुडे, रो. डॉ. सचिन तोरवे, रो. सुरेश मोरे, रो. प्रशांत घुले, रो. राकेश गानबोटे, रो. संदीप वाशिंबेकर, रो. संजय बानकर यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले. तर 
________________________________________

फोटो : रोटरी क्लब ऑफ इंदापूरचा पदग्रहण समारंभ संपन्न झाला.
close