अनंतराव पवार विद्यालय व अनंतराव पवार प्राथमिक विद्यालय निर निमगाव शाळेचा शिष्यवृत्ती परीक्षेत शंभर टक्के निकाल .
इंदापूर : फेब्रुवारी 2026 मध्ये घेण्यात आलेल्या प्राथमिक व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता चौथी व इयत्ता सातवी या परीक्षेत कै.अनंतराव पवार ग्राम विकास प्रतिष्ठान संचलित ,अनंतराव पवार प्राथमिकचे इयत्ता चौथीचे सहा विद्यार्थी व इयत्ता सातवीचे दोन विद्यार्थी त्याचबरोबर माध्यमिक विद्यालय निरनिमगाव या विद्यालयातील नऊपैकी नऊ विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत पास झाले आहेत. शाळेचा शंभर टक्के निकाल लागला आहे. अशी माहिती विद्यालयाचे मुख्याध्यापक बाळासाहेब मोरे व प्राथमिकचे मुख्याध्यापक छगन पिसे यांनी दिली.
शिष्यवृत्ती परीक्षेत पास झालेले विद्यार्थी :
अनंतराव पवार प्राथमिक विद्यालय विभाग इयत्ता सातवी शिष्यवृत्तीतील उत्तीर्ण विद्यार्थी : आराध्या देवडे 238, शुभम फडतरे 222.
इयत्ता चौथी शिष्यवृत्ती उत्तीर्ण विद्यार्थी: परिनीती गायकवाड 214, कार्तिकी पाटील 204, रणवीर मासाळ 196, मनस्विनी मजगे 194, ज्ञानेश्वरी काळे 186, अक्षया गरगडे 182,
अनंतराव पवार विद्यालय इयत्ता सातवीतील शिष्यवृत्तीतील उत्तीर्ण विद्यार्थी : अथर्व शेंडगे 238,नंदिनी गरगडे 236,अमृता घोगरे 236, सिद्धी आगलावे 232, श्रेया बुरुंगले 230, सानिका मुळीक 226, सोहम लाळगे 216, श्रेयश काटकर 194, शिवम गरगडे 194.
वरील सर्व विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती विभागप्रमुख श्रीम. घोगरे ए .डी, मोरे बी .एम . गोरे ए .पी., मोरे ए .व्ही. तसेच जगताप एस ए व साठे एल व्ही यांनी मार्गदर्शन केले असून
संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दत्ताजीराव घोगरे ,उपाध्यक्ष रणजीत घोगरे, सचिव अजित घोगरे व संचालक मंडळ यांनी सर्व शिक्षकांचे व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन केले.
--------------------------------
फोटो ओळ: अनंतराव पवार विद्यालय व अनंतराव पवार प्राथमिक विद्यालय निर निमगाव शाळेचा शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तीर्ण झालेले विद्यार्थी.

