shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

समरसतेचा वारकरी ग्रंथ सोहळा कल्याण येथे उत्साहात संपन्न...

प्रतिनिधी मोहन शेगर 
मुबंई,शिव निरंजन सेवा प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्य आणि विमुक्त घुमंतू जनजाती विकास परिषद (अखिल भारतीय), महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने "समरसतेचा वारकरी" या ग्रंथाचा भव्य प्रकाशन व गौरव सोहळा शनिवार, दि. २६ जुलै रोजी कल्याण येथे उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला, सामाजिक समरसता, समता, बंधुभाव आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते आणि स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते, 

कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज, भारतमाता, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पूजनीय, नारायण तात्या स्वरूपे पाटील महाराज तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांच्या प्रतिमांचे पूजन करून करण्यात आली, यावेळी पद्मश्री कर्मवीर दादा इदाते, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक डॉ. रमेश पांडव, मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे आमदार किसन कथोरे, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन अरुण पाटील, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे नगरसेवक तथा गटनेते कांबळे साहेब, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे नगरसेवक अमित धाक्रस, भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते ओम प्रकाश शर्माजी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा प्रमुख नितीन शिंत्रे एपीएमसी मार्केट कल्याण अध्यक्ष रवींद्र घोडविंदे, माजी मंत्री जगन्नाथ पाटील, विमुक्त घुमंतू जनजाती विकास परिषदेचे राष्ट्रीय कार्यवाहक अनिल फड, गिरधर साळुंखे, मुंबई जिल्हा उपाध्यक्षा अर्चना पवार लष्कर, शिव निरंजन सेवा प्रतिष्ठानचे पदाधिकारी नीरज शिंदे, स्वप्निल शेगर, शितल शिंदे, सुशीला शेगर, सागर शिंदे , महेंद्र ठाकरे, मच्छिंद्र पष्टे, प्रितेश जैन,यांच्यासह विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते, तसेच कोल्हापूर, बीड, पालघर, नागपूर, नाशिक आणि महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतून आलेले प्रमुख पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, स्वयंसेवक आणि समरसतेच्या विचाराशी बांधिल असलेले नागरिक मोठ्या संख्येने या सोहळ्यास उपस्थित राहिले, समरसतेचा वारकरी हा ग्रंथ पद्मश्री कर्मवीर दादा इदाते यांच्या जीवनकार्याचा, सामाजिक समरसतेच्या विचारांचा, भटके-विमुक्त समाजाच्या उन्नतीसाठी केलेल्या कार्याचा आणि समाजाला जोडणाऱ्या राष्ट्रकार्याचा प्रेरणादायी दस्तऐवज असल्याचे मान्यवरांनी आपल्या मनोगतात सांगितले, समाजातील विषमता दूर करून प्रत्येक घटकाला सन्मानाने जगण्याची संधी मिळणे हीच खरी सामाजिक समरसता असल्याचे प्रतिपादन करण्यात आले, राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये घडणारी व्यक्ती निर्माण प्रक्रिया, समाजातील भेदभाव दूर करण्यासाठी स्वयंसेवकांनी केलेले कार्य, सामाजिक समरसता मंचाच्या माध्यमातून उभारलेले विविध उपक्रम आणि भटके-विमुक्त समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी झालेले प्रयत्न या ग्रंथातून प्रभावीपणे मांडण्यात आले असून हा ग्रंथ भावी पिढीसाठी प्रेरणादायी ठरेल, असे मत उपस्थितांनी व्यक्त केले, समाजाला जोडणारे विचारच राष्ट्राला बळकट करतात, समरसता ही केवळ विचार नसून जीवन जगण्याची संस्कृती आहे, प्रत्येक व्यक्तीचा सन्मान, परस्पर विश्वास, आत्मीयता आणि बंधुभाव हीच भारताच्या संस्कृतीची खरी ओळख असल्याचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला, या भव्य कार्यक्रमाचे आयोजन शिव निरंजन सेवा प्रतिष्ठान, महाराष्ट्र  अध्यक्ष श्री. सुदाम शिंदे सेवानिवृत्त वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले, तर विकास रामचंद्र जगताप, विमुक्त घुमंतू जनजाती विकास परिषद व शिव निरंजन सेवा प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्यचे मुख्य कायदेशीर सल्लागार यांनी कार्यक्रमाच्या नियोजन, समन्वय आणि यशस्वी आयोजनात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली, समरसतेचा विचार समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचविण्याचा संकल्प उपस्थितांनी व्यक्त केला आणि उत्स्फूर्त प्रतिसादात हा सोहळा प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला. 

शुभेच्छुक,.... सुदाम शिंदे सेवानिवृत्त वरिष्ठ पोलीस निरीक्षक तथा अध्यक्ष शिव निरंजन सेवा प्रतिष्ठान ,
close