*दिवंगत पँथर रत्नाकर (तात्या) मखरे यांना ७५ व्या जयंतीदिनी विनम्र अभिवादन!*
(*दि. ९ जुलै २०२६*)
इंदापूरच्या सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय इतिहासात ज्यांचे कार्य सुवर्णाक्षरांनी नोंदले गेले, असे इंदापूर नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष, मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह ट्रस्टचे तत्कालीन अध्यक्ष, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीचे संस्थापक, साप्ताहिक संधीसाधूचे संस्थापक,इंदापूरच्या शिवजयंतीचे प्रणेते,
गेली चार दशके त्यांनी गरीब, वंचित, पीडित आणि शोषित घटकांच्या न्यायासाठी निस्वार्थपणे संघर्ष केला. सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीत त्यांनी रिपब्लिकन पक्ष, दलित पँथर आणि विविध बहुजन संघटनांमध्ये सक्रिय सहभाग घेतला. त्यांच्या नेतृत्वामुळे इंदापूर तालुक्यात सामाजिक जागृतीची नवी चळवळ उभी राहिली.
सन १९९० ते १९९२ या काळात त्यांनी इंदापूरचे नगराध्यक्ष म्हणून कार्य करताना लोकाभिमुख विकासाला प्राधान्य दिले. सर्वसामान्य नागरिकांसाठी रुग्णवाहिका सेवा सुरू करण्यास त्यांनी पुढाकार घेतला. नगरपरिषद परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अर्धपुतळ्यांच्या उभारणीत त्यांचे मोलाचे योगदान राहिले.
शिक्षण हेच समाज परिवर्तनाचे प्रभावी साधन आहे, या विचारातून त्यांनी विद्यार्थ्यांसाठी निवास, भोजन आणि शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी अविरत मोलाचे कार्य मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह ट्रस्टच्या माध्यमातून केले. अनेक गरजू विद्यार्थ्यांच्या जीवनाला त्यांनी शिक्षणाची नवी दिशा दिली.
त्यांच्या सामाजिक, राजकीय आणि शैक्षणिक कार्याची दखल घेत महाराष्ट्र शासनाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर दलित मित्र या शासनाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांच्या सामाजिक, राजकीय कार्याची दखल आंबेडकरी चळवळीतील नेत्यांनी घेतली आहे. "आंबेडकरी चळवळीतील अभ्यासू, लढवय्ये आणि निष्ठावान नेते" म्हणून गौरविण्यात आले.
आज त्यांच्या ७५ व्या जयंतीनिमित्त त्यांच्या विचारांचा आणि कार्याचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याचा संकल्प करूया. समाजहित, शिक्षण, समता आणि न्यायासाठी त्यांनी दाखविलेला मार्ग हा आजही प्रेरणादायी आहे.
दिवंगत रत्नाकर (तात्या) मखरे यांना ७५ व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
💐💐🙏🏻🙏🏻
अभिवादक: नानासाहेब सानप सर,इंदापूर 🙏🏻

