shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

ज्ञानवर्धिनी बालक मंदिरच्या चेअरमनपदी पत्रकार अमोल वैद्य तर मॉडर्न हायस्कूल चेअरमनपदी प्रतिमा कुलकर्णी, प्रशासकीय अधिकारी पदी संतोष कचरे यांची निवड

अकोले दि. 5 जुलै (प्रतिनिधी)

अकोले तालुक्यातील गुणवत्तापूर्ण शिक्षणाची परंपरा जपणाऱ्या  ज्ञानवर्धिनी बालक मंदिर या नामांकित शैक्षणिक संस्थेच्या चेअरमनपदी ज्येष्ठ पत्रकार अमोल वैद्य यांची तर जुन्या असलेल्या मॉडर्न हायस्कूल अकोले च्या चेअरमन पदी  सामाजिक कार्यकर्त्या सौ. प्रतिमा कुलकर्णी यांची निवड करण्यात आली. तर हिंद सेवा मंडळ संचलीत अकोले विभागाच्या प्रशासकीय अधिकारी पदी सेवानिवृत्त प्राचार्य संतोष कचरे यांची  निवड करण्यात आली आहे. 

     प्रा. अमोल वैद्य यांचे शिक्षण एम. ए. बी. एड. व डिप्लोमा जर्णालिझम झाले असून सध्या ते अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे जिल्हाध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत. तसेच सुगाव खुर्द गावचे माजी सरपंच, महात्मा गांधी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष, रोटरी क्लब अकोलेचे संस्थापक आणि रोटरी इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट 3132 चे माजी असिस्टंट गव्हर्नर म्हणून त्यांनी सामाजिक, शैक्षणिक आणि विकासात्मक कार्यात उल्लेखनीय योगदान दिले आहे. त्यांच्या नेतृत्वक्षमतेची दखल घेत संस्थेने त्यांच्यावर चेअरमनपदाची जबाबदारी सोपविली आहे.
     सेवा निवृत्त प्राचार्य संतोष कचरे हे जनजाती कल्याण समितीचे जिल्हाध्यक्ष आहेत. मॉर्डन हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज चे माजी प्राचार्य असून जनजाती कल्याण आश्रम येथील विद्यार्थ्यांना चांगल्या सुविधा व गुणवत्ता पूर्ण शिक्षण देण्यासाठी ते नेहमीच आग्रही राहिले आहेत.
       प्रतिमा कुलकर्णी यांचे शिक्षण एम ए बी एड झाले असून यांनी शिक्षक म्हणून काम केले असून बाल आनंदवाडी ही प्रयोगशील बालवाडी अनेक वर्षे चालवली आहे. एकल महिलांच्या प्रश्नावर व त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी सध्या काम करत आहेत. सामाजिक व विधायक उपक्रक्रमांत त्यांचा सक्रिय सहभाग असतो.त्यांची मॉडर्न हायस्कूल च्या चेअरमन पदी निवड करण्यात आली आहे.
त्यांच्या या निवडीचे हिंद सेवा मंडळाचे मानद सचिव संजय जोशी, कार्याध्यक्ष सुमतीलाल कोठारी, संचालक दिलीपकुमार शहा, सचिव सहाय्यक योगेश देशमुख, मॉडर्न ज्युनियर कॉलेजचे चेअरमन नगराध्यक्ष बाळासाहेब वडजे  यांचेसह मंडळाचे सर्व पदाधिकारी व स्थानिक स्कूल कमिटी सदस्य, पालक व विविध क्षेत्रातील नागरिकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
close