श्री साई समाधीची मर्यादा राखा रे,
भाविकांच्या श्रद्धेचा मान जपा रे।
शिर्डी ही भूमी पवित्र अन् न्यारी,
साई चरणी ठेवा सेवा सारी॥
https://www.saibabaofindia.com/live-shirdi-sai-baba-darshan-samadhi-mandir.htm
साईंचे जीवन सत्याचा दीप,
त्यांच्या विचारांचा अखंड हा स्वरूप।
चित्रपट, कीर्ती, कला असो भारी,
समाधीची मर्यादा राहो पवित्र सारी॥
श्री साईंची समाधी भावविश्वाची शान,
तिथेच नांदतो भक्तीचा प्राण।
क्षणिक प्रसिद्धीपेक्षा मोठा आहे धर्म,
मर्यादा राखण्यातच आहे खरा कर्म॥
अधिकार लाभला म्हणजे विसरू नका भान,
श्रद्धा जपणे हेच पहिले कर्तव्य महान।
परवानगी देताना ठेवा विवेक जागा,
भावनांचा दीप कधी विझू देऊ नका॥
सुरक्षेची जबाबदारी विसरू नका रे,
पवित्र स्थळांचे रक्षण करा रे।
साईंच्या दारी येतो जनसमुदाय,
जागरूक राहणे हाच खरा उपाय॥
कलावंत, निर्माता, अधिकारी सारे,
साईंच्या चरणी व्हा नम्र भावे।
समाधीचा सन्मान राखा अंतरी,
तेथेच साईंची कृपा अवतरी॥
चला भक्तांनो करू या प्रार्थना,
जपू या श्रद्धा, सबुरी, साधना।
शिर्डीची पावन ओळख राहो अखंड,
साईबाबांचा महिमा घुमो आनंद॥
श्री साई समाधीची मर्यादा राखा रे,
भाविकांच्या श्रद्धेचा मान जपा रे।
शिर्डी ही भूमी पवित्र अन् न्यारी,
साई चरणी ठेवा सेवा सारी॥
प्रस्तुती: शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह म्युझिक टिम, अहिल्यानगर
गितकार: रमेश जेठे सर, जिल्हा अहिल्यानगर

