*(इंदापूर दि.१)*: मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह ट्रस्ट संचलित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा व मुलांचे , मुलींचे अनुदानित वसतिगृह यांच्या संयुक्त विद्यमाने संस्थेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर शैक्षणिक संकुलात साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या प्रारंभी संस्थेचे उपाध्यक्ष तानाजी मिसाळ, सचिव ॲड.समीर मखरे यांच्या हस्ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी तथागत गौतम बुद्ध मूर्ती, माजी नगराध्यक्ष दिवंगत रत्नाकर मखरे (तात्या) यांच्या प्रतिमांना पुष्प अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
या प्रसंगी शालेय प्रतिनिधी निवडणूक - २०२६ च्या विजयी उमेदवारांना प्रमाणपत्र मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
विद्यार्थ्यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनावर आधारित भाषणं , गीतं सादर करून त्यांना अभिवादन केले.
कार्यक्रमास मुख्याध्यापक साहेबराव पवार प्राचार्या समता मखरे,सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नानासाहेब सानप यांनी केले तर आभार हिरालाल चंदनशिवे मानले.

