shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

प्रामाणिकपणाचा आदर्श! साई संस्थान एम्प्लॉईज सोसायटीच्या सौ. नीता बाविस्कर यांनी साईभक्तांचे दोन मोबाईल सुखरूप परत करून जिंकली सर्वांची मने


कर्तव्यनिष्ठेला सलाम! हरवलेले मोबाईल साईभक्तांच्या स्वाधीन; सौ. नीता बाविस्कर यांच्या प्रामाणिकपणाचा पोलीस निरीक्षकांच्या हस्ते गौरव

शिर्डी प्रतिनिधी – (तुषार महाजन)

शिर्डी हे साईभक्तांच्या श्रद्धेचे जागतिक तीर्थक्षेत्र असून येथे दररोज हजारो भाविक दर्शनासाठी येत असतात. अशा गर्दीच्या वातावरणात अनेकदा मौल्यवान वस्तू हरवण्याच्या घटना घडतात. मात्र, अशा वेळी प्रामाणिकपणा आणि कर्तव्यनिष्ठा जपणारे कर्मचारी संस्थेची प्रतिमा अधिक उंचावतात. याचेच प्रेरणादायी उदाहरण साई संस्थान एम्प्लॉईज सोसायटीच्या कर्मचारी सौ. नीता भारत बाविस्कर यांनी घालून दिले आहे.
सौ. नीता बाविस्कर या गेट क्रमांक २ येथील ज्येष्ठ नागरिक पादत्राणे विभागात आपले कर्तव्य बजावत असताना त्यांच्या नजरेस समोरील बाकावर पडलेले दोन मोबाईल फोन आढळून आले. कोणताही मोह न बाळगता त्यांनी तात्काळ ते मोबाईल साई संस्थानच्या संरक्षण विभागाकडे जमा केले.

संरक्षण विभागाने आवश्यक चौकशी करून मोबाईलची ओळख पटविली. हे मोबाईल साईभक्त सौ. के. गंगा पार्वती तेलगंगा (मोबाईल क्रमांक – 9959586068) यांचे असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर सर्व खातरजमा करून त्यांना त्यांचे दोन्ही मोबाईल सुरक्षितपणे परत देण्यात आले. हरवलेले मोबाईल परत मिळाल्याने साईभक्तांनी समाधान व्यक्त करत सौ. नीता बाविस्कर यांच्या प्रामाणिकपणाबद्दल मनःपूर्वक आभार मानले.

सौ. नीता बाविस्कर यांच्या या उल्लेखनीय प्रामाणिकपणाची दखल घेत पोलीस निरीक्षक रोहिदासजी माळी यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी पत्रकार संजय महाजन उपस्थित होते.

या कौतुकास्पद कार्याबद्दल साई संस्थान एम्प्लॉईज सोसायटीचे चेअरमन विठ्ठलराव पवार, व्हाईस चेअरमन पोपटराव कोते, संचालक मंडळ, सचिव, सहसचिव तसेच सर्व कर्मचारी बांधवांनी सौ. नीता बाविस्कर यांचे अभिनंदन करून पुढील सेवेसाठी शुभेच्छा दिल्या.

श्रद्धा आणि सेवाभावाच्या भूमीत प्रामाणिकपणा हीच खरी ओळख आहे. सौ. नीता भारत बाविस्कर यांनी दाखविलेली सचोटी ही केवळ हरवलेले मोबाईल परत करण्याची घटना नसून, साईबाबांच्या "श्रद्धा आणि सबुरी" या शिकवणीला कृतीतून दिलेला मानाचा मुजरा आहे. त्यांच्या या कार्यामुळे साई संस्थान एम्प्लॉईज सोसायटीची प्रतिमा अधिक उजळली असून, इतर कर्मचाऱ्यांसाठीही त्यांनी एक आदर्श निर्माण केला आहे.
close