shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

वडापुरीत रविवारी होणार एक दिवसीय श्री नवनाथ पारायण सोहळा.

वडापुरीत रविवारी होणार एक दिवसीय श्री नवनाथ पारायण सोहळा.
इंदापूर : इंदापूर तालुक्यातील वडापुरी गावामध्ये   श्रीनाथ मंदिर श्री मच्छिंद्रनाथ व श्री गोरक्षनाथ यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीमध्ये रविवार दिनांक 30 ऑगस्ट रोजी सकाळी 6 ते सायंकाळी 6 या वेळेत एक दिवसीय श्री नवनाथ पारायण सोहळा गुरुवर्य अविनाश बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न होणार आहे. श्रावण महिन्याच्या शुभप्रसंगी  या पारायण सोहळ्यामध्ये  पारायण वाचण्यासाठी मुली मुले महिला व पुरुष बसू शकतात. पारायण साठी श्री गुरुदेव दत्त भक्त परिवाराच्या वतीने  ग्रंथ उपलब्ध होणार आहेत. पारायण सोहळ्या मध्ये महाप्रसाद भागवत काटकर यांच्यावतीने देण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे आयोजन समस्त ग्रामस्थ वडापुरी व पंचक्रोशी भाविक भक्तांच्या वतीने करण्यात आले आहे. सायंकाळी 5 वाजून 21 मिनिटांनी गुरुवर्य अविनाश बडगुजर यांचे मार्गदर्शन होणार आहे.
close