वनविभाग तथा ग्रामपंचायत
प्रशासनाने लक्ष द्यावे - मागणी
श्रीरामपूर / प्रतिनिधी:
तालुक्यातील बेलापूर बुद्रुक ! ऐनतपूर येथील बांगल वस्ती रोड परिसरात बिबट्याचा वावर वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
नुकतेच काल रात्री सोमनाथ वसंत राशीनकर यांच्या घरासमोरील बांधलेल्या शेळ्यावर बिबट्याने हल्ला करून एका शेळीला ठार केले असून एका कुत्र्यालाही ओढत घेऊन गेल्याची घटना घडली आहे.
या घटनेमुळे परिसरातील नागरिक तसेच शाळेत जाणाऱ्या मुलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यातच बांगल वस्ती रोडवर पथदिवे नसल्यामुळे रात्री मोठा अंधार असतो, त्यामुळे बिबट्याचा धोका आणखी वाढला आहे.
दरम्यान, गौसे आजम सेवाभावी संस्थेच्या वतीने ग्रामपंचायत प्रशासनाकडे पथदिवे बसविण्याची मागणी सोबतच वनविभागाने तात्काळ बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात अशी मागणीही संस्थेच्या वतीने करण्यात येत आहे.
नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न लक्षात घेता ग्रामपंचायत व वनविभागाने तातडीने दखल घेऊन आवश्यक कार्यवाही करावी अशी अपेक्षा नागरीकांकडून व्यक्त होत आहे.
*वृत्त विशेष सहयोग*
पत्रकार अजीजभाई शेख - राहाता
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता मीडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर - 9561174111

