नेहमीच सामान्य जनतेच्या व विद्यार्थ्यांच्या हिताला प्राधान्य दिले - मनोज पाटील.
हनुमान विद्यालय सुरवड येथे हर्षवर्धन पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम.
इंदापूर: माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे सामाजिक व राजकीय क्षेत्रातील योगदान अत्यंत मोलाचे असून त्यांनी नेहमीच सामान्य जनतेच्या व विद्यार्थ्यांच्या हिताला प्राधान्य दिले असे प्रतिपादन श्री शिवाजी एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष मनोज पाटील यांनी सुरवड येथील श्री हनुमान विद्यालय येथे हर्षवर्धन पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या विविध सामाजिक उपक्रमा प्रसंगी केले.
श्री शिवाजी एज्युकेशन सोसायटी संचलित हनुमान विद्यालय सुरवड (ता- इंदापूर )येथे राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष व माजी मंत्री आणि संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांचा 63 वा वाढदिवस निमित्त
विद्यालयात विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. तसेच मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले. रक्तदान शिबिरामध्ये 50 रक्तदात्याने रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली.
याप्रसंगी सुरवड गावातील भैरवनाथ पाणीपुरवठा संस्थाचे चेअरमन दत्तात्रय घोगरे यांनी सामाजिक वनीकरण मार्फत वृक्षारोपणासाठी प्रत्येक विद्यार्थ्यासाठी एक झाड दिले व त्या झाडाचे संगोपन करून एका वर्षात ज्यांचे झाड मोठे होईल त्या विद्यार्थ्याला योग्य प्रमाणात बक्षीस देण्याची जाहीर केले तसेच निरा भिमा कारखान्याची व्हाईस चेअरमन दादासाहेब घोगरे यांनी इयत्ता दहावी मध्ये प्रथम तीन क्रमांकाला बक्षीस दिले. शाळेमध्ये वाढदिवसानिमित्त विविध स्पर्धांमध्ये सहभाग घेऊन प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांकाच्या विद्यार्थ्यांना ट्रॉफी देण्यात आली .मारुती विविध कार्यकारी सहकारी सोसायटी सुरवड चेअरमन व संचालक मंडळ यांच्या वतीने साहेबराव घोगरे यांच्या हस्ते विद्यालयाला 12 खुर्च्या देण्यात आल्या .
यावेळी हर्षवर्धन पाटील सहकारी वाहतूक संघाचे चेअरमन सुरेश मेहेर यांनी शुभेच्छा आल्या.
यावेळी हनुमान विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तात्यासाहेब कोरटकर, शिवाजी कोरटकर ,सुर्वे नाना, चंद्रकांत शेरकर ,चांगदेव घोगरे ,बाळासाहेब घोगरे, भैय्या माने व भरत कोरटकर ,राजेंद्र शिंदे, राजेंद्र कोरटकर उपस्थित ग्रामस्थ आणि विद्यार्थी सूत्रसंचालन अखिल कांबळे सर यांनी केले तर आभार संजय शिंदे मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली..
--------------------------------------------------------------------
हर्षवर्धन पाटील यांनी जीवनात कार्य करताना शिक्षण, सामाजिक, विकास ,ग्रामीण भागाचा विकास आणि सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांना नेहमी प्राधान्य दिले आहे. त्यांच्या कार्यामध्ये नेतृत्व बरोबर समाज प्रती असलेली बांधिलकी आणि विकासाची स्पष्ट दृष्टी दिसून येते .ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाच्या संधी मिळाव्यात विद्यार्थ्यांनी आधुनिक शिक्षणाबरोबर संस्कार आणि मूल्य आत्मसात करावी यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले असल्याचे त्यांनी सांगितले.
हनुमान विद्यालय सुरवड शाळेची स्थापना 1997 साली त्यांनी केली. आजच्या तरुण पिढीसमोर अनेक आव्हाने आहेत .अशा परिस्थितीत शिक्षण, संस्कार आणि योग्य मार्गदर्शन यांची सांगड घालून सक्षम पिढी घडविणे ही काळाची गरज आहे. या विचारांना बळ देणारे नेतृत्व आपल्याला हर्षवर्धन पाटील यांच्या कार्यातून दिसून येते. - मुख्याध्यापक शरद व्यवहारे
---------------------
फोटो ओळ: श्री शिवाजी एज्युकेशन सोसायटी संचलित हनुमान विद्यालय सुरवड येथे हर्षवर्धन पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रमातून विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप करताना मान्यवर.

