श्रीरामपूर (प्रतिनिधी) : अहिल्यानगर येथील साम टीव्ही चे पत्रकार सुशील थोरात यांच्यावर हल्ला करून बेदम मारहाण करणाऱ्या ६ आरोपीवर मोक्का अंतर्गत कारवाई करावी अशी मागणी श्रीरामपूर मराठी पत्रकार संघाने केली आहे.
श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे पोलीस उप अधीक्षक जयदत्त भवर व पोलीस निरीक्षक विशाल खैरे यांना पत्रकारांनी निवेदन दिले.यावेळी बोलतांना संपादक मनोज आगे म्हणाले की, जिल्ह्यातील पत्रकारांवर सातत्याने हल्ले होत आहेत.सदर बाब अतिशय गंभीर असून सत्य असलेली घटनेची बाजू पत्रकार आपल्या वृत्तपत्र व टीव्ही,पोर्टलच्या माध्यमातून जनतेसमोर मांडत असतात.परंतु आपल्या विरोधात बातम्या आल्या तर गुन्हेगारी क्षेत्रातील लोक पत्रकारांना लक्ष करीत आहेत.
संपादक करण नवले म्हणाले की,अहिल्यानगर येथील पत्रकार श्री.थोरात यांनाझालेली जिवे मारण्याची घटना अतिशय निंदनीय आहे.त्यांना जाणून बुजून गुंड प्रवृत्ती व गुन्हेगार असलेल्या सहा लोकांनी बेदम मारहाण केलेली आहे. त्यामुळे या आरोपीवर मोक्का अंतर्गत कारवाई कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली.यावेळी जय महाराष्ट्र टीव्हीचे जयेश सावंत यांनीही या घटनेचा निषेध करून कारवाईची मागणी केली.
निवेदनात म्हटले आहे की,पत्रकार श्री.थोरात यांच्यावर अवैध व्यवसायाची बातमी प्रसिद्ध केल्याचा राग मनात धरून काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी हल्ला करून बेदम मारहाण केली आहे. अतिशय शुल्लक कारणावरून त्यांना गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी बेदम मारहाण केली. गेल्या काही दिवसांपासून पत्रकारांवरील होणारे हल्ल्यांचे प्रमाण वाढले आहे.सदरचे प्रकरण हे गंभीर असून याबाबत राज्य शासनाने व पोलीस विभागाने कडक पावले उचलावीत अशी मागणी श्रीरामपूर मराठी पत्रकार संघाच्यावतीने करण्यात येत आहे.यावेळी ज्येष्ठ पत्रकार पद्माकर शिंपी, ॲड,बाळासाहेब आगे,
नागेश सावंत,महेश रक्ताटे,प्रदीप आहेर,सुरेश कांगुणे,सचिन उघडे, सलीमखान पठाण,राहुल मुथा,सुधीर लोळगे,अरुण पाटील,असलम बिनसाद, संतोष बनकर,पंकज कोठारी,रियाज पठाण आदी उपस्थित होते.
000

