shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

स्वातंत्र्याचा अभिमान, विद्यार्थ्यांचा कलाविष्कार; बनसुडे विद्यालयात ८० वा स्वातंत्र्य दिन दिमाखात

 

 स्वातंत्र्याचा अभिमान, विद्यार्थ्यांचा कलाविष्कार; बनसुडे विद्यालयात ८० वा स्वातंत्र्य दिन दिमाखात 
पळसदेव, ता. इंदापूर : येथील गीता शिक्षण प्रसारक मंडळ संचलित एल. जी. बनसुडे इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पळसदेव येथे भारताचा ८० वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात, दिमाखात आणि देशभक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. राष्ट्रगीतानंतर ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम्’ आणि ‘जय हिंद’ या घोषणांनी शाळेचा परिसर दुमदुमून गेला.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष श्री. हनुमंत नाना बनसुडे, उपाध्यक्ष श्री. डॉ. शितलकुमार शहा, कार्याध्यक्षा सौ. नंदाताई बनसुडे, सचिव श्री. सुरज बनसुडे, श्री. संजय गायकवाड (विपश्यना मार्गदर्शक), सौ. विजया गायकवाड (विपश्यना मार्गदर्शन तज्ज्ञ), श्री. विजयकुमार कोंडिराम पंडित-पोतदार (अध्यक्ष, कोंडिराम त्र्यंबक पोतदार फाउंडेशन), श्री. हनुमंत (आप्पा) मोरे, श्री. अंकुश (तात्या) बनसुडे, कु. दर्शन बनसुडे, सौ. अर्चनाताई बनसुडे, सौ. अनुराधाताई कणके, श्री. विठ्ठल (काका) बनसुडे, श्री. बाबा (आप्पा) बनसुडे, श्री. उत्तम बनसुडे (रावसाहेब), श्री. विठ्ठल नामदेव शिंदे (मेजर), श्री. अजित शिंदे, श्री. अमित बनसुडे, श्री. सुनील देवकाते, श्री. पवन वाबळे, श्री. आण्णा ठोंबरे, सौ. जयाताई झणझणे, श्री. सचिन शेलार, श्री. तुषार सरडे, श्री. मोहन बनसुडे सर, श्री. देवराज शिंदे, श्री. तुळशीराम काळे (माजी सरपंच, पळसदेव),प्राचार्य श्री. संजय इंगोले ,   मुख्याध्यापिका सौ.सीमा बाराते , (उपमुख्याध्यापिका)सौ. सुवर्णा वाघमोडे ,(समन्वयक)सौ. तेजस्विनी तनपुरे , (विभाग प्रमुख )सौ. जयश्री लावंड, सौ. ज्योती मारकड, सौ. तनुजा फ़ुगे  पालकवर्गातून श्री. तुषार चव्हाण, श्री. प्रितम लावंड व श्री. अवधूत काळे यांच्यासह सर्व , शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी व पालकवर्ग यांची प्रमुख उपस्थिती होती.
स्वातंत्र्य दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी आपल्या विविध कलागुणांचे मनोहारी प्रदर्शन केले. भाषणे, देशभक्तीपर गीते, नृत्य, झांज, डंबेल्स, योगासने आणि कवायत अशा विविध सादरीकरणांतून विद्यार्थ्यांनी शिस्त, आत्मविश्वास, कलाकौशल्य आणि देशभक्तीची भावना प्रभावीपणे व्यक्त केली. प्री-प्रायमरी विभागातील चिमुकल्यांनी स्वातंत्र्यसैनिकांच्या भूमिका साकारत उपस्थितांची विशेष दाद मिळवली.
स्वातंत्र्य दिनानिमित्त शाळेच्या वतीने गावातून भव्य प्रभात फेरी काढण्यात आली. विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर तसेच समाजप्रबोधनपर घोषवाक्ये देत राष्ट्रप्रेम, राष्ट्रीय एकात्मता आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश दिला.
यावेळी इयत्ता दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा कोंडिराम त्र्यंबक पोतदार फाउंडेशन व शाळेच्या वतीने गुणगौरव करण्यात आला. गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करून त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. पालकांनीही शाळेच्या शैक्षणिक कार्याचे कौतुक करत, शाळा विद्यार्थ्यांना योग्य दिशा देणारी, मार्गदर्शन करणारी आणि प्रेरणादायी संस्था असल्याचे गौरवोद्गार व्यक्त केले.




कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. प्रकाश दरदरे व श्री. प्रवीण मदने यांनी प्रभावीपणे केले, तर सौ. विद्या पोटे यांनी आभार प्रदर्शन केले.
कार्यक्रमाच्या सांगतेपूर्वी शाळा, ग्रामपंचायत व पालकांच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले.
शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक आणि विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे स्वातंत्र्य दिनाचा हा सोहळा अत्यंत उत्साहपूर्ण, शिस्तबद्ध आणि देशभक्तीमय वातावरणात यशस्वीपणे संपन्न झाला.
🇮🇳 जय हिंद! जय भारत! 🇮🇳
close