shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

आय चॅम्पस अबॅकस परीक्षेत एल. जी. बनसूडे इंग्लिश मीडियम स्कूलची घवघवीत कामगिरी

आय चॅम्पस अबॅकस परीक्षेत एल. जी. बनसूडे इंग्लिश मीडियम स्कूलची घवघवीत कामगिरी
इंदापूर : अकलूज येथे ९ ऑगस्ट रोजी आय चॅम्पचे संचालक श्री. विशाल माने सर यांच्या नियोजनाखाली राष्ट्रीय स्तरावरील अबॅकस परीक्षा उत्साहात पार पडली. या प्रतिष्ठित परीक्षेत संपूर्ण पुणे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. एल. जी. बनसूडे इंग्लिश मीडियम स्कूल, पळसदेवच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत शाळेच्या नावलौकिकात आणखी एक मानाचा तुरा रोवला.
राष्ट्रीय स्तरावरील या स्पर्धात्मक परीक्षेत विद्यार्थ्यांनी वेगवान गणिती कौशल्य, अचूकता, उत्कृष्ट एकाग्रता, स्मरणशक्ती आणि तार्किक विचारसरणी यांचे प्रभावी प्रदर्शन केले. कमी वेळेत अचूक गणिती उदाहरणे सोडवून विद्यार्थ्यांनी आपल्या गुणवत्तेची ठळक छाप पाडली.
या परीक्षेत शाळेतील १४ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यामध्ये सर्व विदयार्थी बक्षीस पात्रही ठरले त्यापैकी कु. स्वरा नगरे हिची ‘सुपरस्टार’ म्हणून बक्षीस पात्र ठरली  विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या सौ. सुवर्णा वाघमोडे मॅडम यांचाही विशेष  उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शिक्षिका म्हणून स्टार अबॅकस बेस्ट टीचर अवॉर्ड’ देऊन गौरविण्यात आले.
या उल्लेखनीय यशाबद्दल गीता शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री. हनुमंत (नाना) बनसूडे, उपाध्यक्ष डॉ. शीतलकुमार शहा, कार्याध्यक्षा सौ. नंदाताई (नानी) बनसूडे, सचिव श्री. सूरज बनसूडे, प्राचार्य श्री. संजय इंगोले, मुख्याध्यापिका सौ. सीमा बाराते, उपमुख्याध्यापिका सौ. सुवर्णा वाघमोडे, समन्वयक सौ. तेजस्विनी तनपुरे, विभागप्रमुख श्री. प्रवीण मदने, सौ. जयश्री लावंड, सौ. ज्योती मारकड आणि सौ. तनुजा फुगे तसेच सर्व विभागप्रमुखांनी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.
विद्यार्थ्यांनी मिळवलेले हे यश त्यांच्या सातत्यपूर्ण सराव, परिश्रम आणि शिक्षकांच्या योग्य मार्गदर्शनाचे फलित आहे. आजचे हे यश म्हणजे उद्याच्या मोठ्या स्वप्नांची सुरुवात आहे. वेगवान विचार, अचूक निर्णयक्षमता आणि एकाग्रतेची सवय विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वाटचालीत निश्चितच उपयुक्त ठरणार आहे. राष्ट्रीय स्तरावर मिळवलेले हे यश विद्यार्थ्यांना अधिक उंच ध्येय ठेवण्याची आणि ते साध्य करण्याची प्रेरणा देणारे आहे.
“सरावाला शिस्तीची जोड आणि मेहनतीला योग्य मार्गदर्शन मिळाले, तर यशाची शिखरे गाठणे निश्चितच शक्य होते.” या यशातून विद्यार्थ्यांनी हीच प्रेरणा घेत पुढील वाटचाल करावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
भविष्यातही विद्यार्थ्यांनी अशीच सातत्यपूर्ण कामगिरी करत राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर शाळेचे नाव उज्ज्वल करावे, अशी अपेक्षा मान्यवरांनी व्यक्त केली.
या यशाबद्दल पळसदेव व पंचक्रोशीतील पालक, ग्रामस्थ आणि शिक्षणप्रेमींनी विद्यार्
close