shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

हर्षवर्धन पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त श्री शिवाजी एज्युकेशन सोसायटी बावडा येथे विविध सामाजिक, आरोग्यविषयक व शैक्षणिक उपक्रमांचे आयोजन.


  हर्षवर्धन पाटील  यांच्या वाढदिवसानिमित्त श्री शिवाजी एज्युकेशन सोसायटी बावडा येथे विविध सामाजिक, आरोग्यविषयक व शैक्षणिक उपक्रमांचे आयोजन. 
बावडा( ता. इंदापूर ): श्री शिवाजी एज्युकेशन सोसायटी बावडा यांच्या वतीने माजी सहकार मंत्री  हर्षवर्धन पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शुक्रवार, दिनांक 21 ऑगस्ट 2026 रोजी श्री शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय शैक्षणिक संकुल, बावडा येथे विविध सामाजिक, आरोग्यविषयक व शैक्षणिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
 वाढदिवसानिमित्त आयोजित प्रमुख उपक्रमांमध्ये रक्तदान शिबिर, मोफत डोळे तपासणी व मोतीबिंदू शिबिर, पोस्टर बनवणे स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, केक कापणे, सत्कार समारंभ, शालेय साहित्य व गणवेश वाटप तसेच विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण समारंभ आहे.
विशेषतः श्री शिवाजी एज्युकेशन सोसायटीच्या विशेष पुढाकाराने पुण्यातील सुप्रसिद्ध बुधराणी हॉस्पिटल व ‘साईट फॉर द साईटलेस’ यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत डोळे तपासणी व मोतीबिंदू शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरामध्ये तज्ज्ञ डॉक्टरांकडून नेत्रतपासणी, मोतीबिंदू तपासणी व आवश्यक मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
याचबरोबर “रक्तदान करा, जीवनदान द्या” या सामाजिक संदेशातून भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. रक्तदान व नेत्रतपासणी शिबिराचे ठिकाण श्री शिवाजी विद्यालय बावडा हे आहे 

 या कार्यक्रमास नागरिक, पालक, माजी विद्यार्थी व हितचिंतकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे तसेच पात्र रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन *श्री शिवाजी एज्युकेशन सोसायटी बावडा व श्री शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय शैक्षणिक संकुलाच्या वतीने संस्थेचे सचिव  उदयसिंह पाटील यांनी आव्हान केले आहे..
close