shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

दुःखद निधन : सिंधुबाई बाबुराव देसाई यांचे निधन

पुणतांबा येथे ३१ ऑगस्ट रोजी दशक्रिया विधी कार्यक्रम

पुणतांबा : येथील गं.भा. सिंधुबाई बाबुराव देसाई यांचे शनिवार, दि. २२ ऑगस्ट २०२६ रोजी दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने देसाई परिवारावर शोककळा पसरली असून, नातेवाईक, आप्तेष्ट व परिचितांकडून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.


सिंधुबाई देसाई या प्रेमळ, कष्टाळू व मनमिळावू स्वभावाच्या होत्या. त्यांनी आपल्या कुटुंबाला प्रेम, संस्कार आणि मायेची ऊब देत संसाराला आधार दिला. त्यांच्या आठवणी कुटुंबीयांच्या मनात सदैव जिवंत राहतील.

त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी सोमवार, दि. ३१ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ८ वाजता, श्रीक्षेत्र पुणतांबा, चांगदेव महाराज मंदिराजवळ, पुणतांबा येथे दशक्रिया विधी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमास नातेवाईक, मित्रपरिवार, आप्तेष्ट व हितचिंतकांनी उपस्थित राहून दिवंगत सिंधुबाई देसाई यांच्या स्मृतींना अभिवादन करावे, असे आवाहन शोकाकुल परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.

शोकाकुल :
श्री. अरुण बाबुराव देसाई (मुलगा)
श्री. राजेंद्र बाबुराव देसाई (मुलगा)
सौ. मंगल राजेंद्र निकम (मुलगी)
समस्त देसाई परिवार, वडाळा महादेव

प्रवचन सेवा : प्रा. ॲड. आदिनाथ जोशी सर

close