shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
 इंदापूर: इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठानचे विश्वासराव रणसिंग कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, कळंब-वालचंदनगर ता. इंदापूर येथे  स्पर्धा परीक्षा समितीच्या वतीने ‘स्पर्धा परीक्षांचा परिचय आणि मार्गदर्शन’ या विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. महाविद्यालयाच्या सेमिनार हॉलमध्ये २५ ऑगस्ट रोजी झालेल्या कार्यक्रमात राज्य कर निरीक्षक म्हणून निवड झालेले अक्षय जालिंदर भोई यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. अशोक काळंगे  होते. प्रास्ताविकात स्पर्धा परीक्षा समितीचे समन्वयक प्रा. सचिन पवार यांनी विद्यार्थ्यांना यूपीएससी, एमपीएससी, एसएससी, बँकिंग, रेल्वे तसेच विविध प्रवेश व पात्रता परीक्षांची माहिती व मार्गदर्शन उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मध्ये स्पर्धा परीक्षा समिती सुरू करण्यात आल्याचे सांगितले.
अक्षय भोई यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विविध परीक्षांचे स्वरूप, अभ्यासक्रम, वेळेचे नियोजन व प्रश्नपत्रिकेच्या पद्धतीबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. स्पर्धा परीक्षेत यश मिळविण्यासाठी जिद्द, चिकाटी आणि योग्य मार्गदर्शनासोबत सातत्यपूर्ण अभ्यास आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांनीही स्पर्धा परीक्षांचे आव्हान स्वीकारावे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यानंतर विद्यार्थ्यांसाठी प्रश्नोत्तर सत्र घेण्यात आले. कार्यक्रमाला ५२ विद्यार्थी व २३ प्राध्यापक उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. नितीन रुपनवर यांनी व  आभार प्रा. प्राजक्ता पवार यांनी मानले.
close