shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

प्रेषित हजरत मुहम्मद पैगंबर जयंतीनिमित्तश्रीरामपूरमध्ये भव्य रक्तदान शिबिर संपन्न


उत्स्फूर्तपणे रक्तदान करून अनेक 
रक्तदात्यांनी घडविले मानवतेचे दर्शन

शौकतभाई शेख / श्रीरामपूर :
प्रेषित हजरत मुहम्मद पैगंबर जयंती (ईद-ए-मिलाद) निमित्ताने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही श्रीरामपूर शहरातील डॉ. सलीम सिकंदर शेख यांच्या बैतुशशिफा हॉस्पिटल येथे विद्रोही सांस्कृतिक व साहित्यिक चळवळ महाराष्ट्र राज्य, जमील काकर मेडिकल फाऊंडेशन व काकर समाज, डॉ. सलीम शेख यांच्या बैतुशशिफा मेडिकल फाउंडेशन तसेच साईसेवा ब्लड बँक, अहिल्यानगर यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

‘मानवता हाच श्रेष्ठ धर्म आहे,’ तसेच प्रेषित हजरत मुहम्मद पैगंबरांनी सांगितलेल्या विचाराप्रमाणे आणि पवित्र दिव्य कुरआनातील “ज्याने एक जीवन वाचविले, त्याने समस्त सृष्टीचा जीव वाचविला आणि ज्याने एका जीवाची रक्षा केली, त्याने संपूर्ण मानवजातीची रक्षा केली,” या शिकवणीनुसार रक्तदान करण्यासाठी तरुण मोठ्या उत्साहाने सहभागी झाले. ‘रक्तदान हे श्रेष्ठ दान’ या भावनेने अनेकांनी स्वेच्छेने रक्तदान केले.
यावेळी रक्तदात्यांमध्ये मोहसीन बाऊन्सर यांनी तब्बल ७० व्यांदा रक्तदान केले. विशेष म्हणजे या शिबिरात विविध धर्मीय नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. रक्तदात्यांसोबत त्यांचे मित्र व नातेवाईकही कुतूहलापोटी रक्तदानासाठी सहभागी होत होते. यू. एस. जैनब ग्रुपचे हाफिज नईम तसेच उमेर शेख ग्रुपनेही शिबिरात सहभागी होऊन रक्तदान केले.
शिबिरास भेट देणाऱ्या मान्यवरांकडून रक्तदात्यांना गुलाबपुष्प, प्रमाणपत्रे, केळी, बिस्कीट तसेच पुस्तके भेट देण्यात आली. शिबिराची सुरुवात शहर-ए-काझी मौलाना अकबरअली यांच्या हस्ते रक्तदाता कलीम बिनसाद यांना पुष्पगुच्छ देऊन करण्यात आली.
शिबिरास भेट देणाऱ्यांमध्ये श्रीरामपूर शहराच्या माजी नगराध्यक्षा राजश्रीताई ससाणे, युवा नेते सिद्धार्थ मुरकुटे, इंडियन मेडिकल असोसिएशनचे माजी राज्य अध्यक्ष डॉ. रवींद्र कुटे, काँग्रेसचे अण्णासाहेब डावखर, पत्रकार प्रदीप आहेर, महाराष्ट्र एकल महिला समितीचे अध्यक्ष मिलिंदकुमार साळवे, संविधान समितीचे अहमदभाई जहागीरदार, विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे राज्य सदस्य शाहीर भीमराव कदम, नगरसेवक दिलीप नगारे, नगरसेवक हाजी मुझफ्फरभाई शेख, राष्ट्रवादीचे मुख्तरभाई शहा, नगरसेवक हाजी अंजूमभाई शेख, श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विशाल खैरे व त्यांचे सहकारी, नगरसेवक जावेद शेख, कॉन्टॅक्टर एस. के. खान, राष्ट्रवादी (अ.पा.) पक्षाचे भैया शहा, राजू दारुवाला, मुदस्सर पटेल, वंचित आघाडीचे श्रीरामपूर अध्यक्ष डॉ. गौतम चित्ते, भाजपाचे साजिद शेख, समाजवादी पार्टीचे जिल्हाध्यक्ष जोएफ जमादार, काँग्रेस सेवा दलचे मास्टर सरवरअली सय्यद, डॉ. नवनीत जोशी, बहुजन समाज पार्टीचे शौकत शेख, एमआयएमचे अरबाज शेख, शिवसेना शिंदे पक्षाचे सलाऊद्दीन शेख, सलीम टर्नर, अहमद शहा, मेहबूब शहा, अकबर पठाण, मेहबूब कुरेशी, ‘तिरंगा’ व ‘बिनधास्त न्यूज’चे संपादक अस्लम बिनसाद, समाजसेवक विजय खाजेकर, काँग्रेसचे नजीर शेख, ग्रामीण कवी आनंदा साळवे, अनिल इंगळे, रणदिवे सर, रज्जाक पठाण, सिद्धार्थ अशोक दिवे, विपुल कदम, पत्रकार नितीन चित्ते, इम्तियाज पठाण आदी मान्यवरांचा समावेश होता.
विशेषतः अहमदनगर जिल्हा उर्दू साहित्य परिषदेचे अध्यक्ष सलीमखान पठाण लिखित ‘ओळख इस्लामची’ हे पुस्तक शिबिरात अनेक मान्यवरांना भेट देण्यात आले.
जास्तीत जास्त रक्तदान घडवून आणण्यासाठी जावेद काकर, विद्रोही चळवळीचे शाहीर भीमराव कदम, विजय जगताप, रज्जाक शेख, ॲड. अमोल सोनवणे, बँक मॅनेजर अकबर शेख, राजू सिकंदर शेख, इंजिनिअर राजू पठाण, साईसेवा ब्लड बँकेचे संचालक अजित जगताप व त्यांच्या टीमने विशेष परिश्रम घेतले. त्यांच्या प्रयत्नांमुळे उत्साही वातावरणात रक्तदान शिबिर यशस्वीरीत्या पार पडले. शिबिरास भेट देणारे मान्यवर तसेच सहकार्य करणाऱ्या सर्वांचे डॉ. सलीम शेख यांनी पुष्पगुच्छ देऊन आभार मानले.

*वृत्त प्रसिद्धी सहयोग
समता मीडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर – 9561174111
close