shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

क्रांती दिनी पुणे–नाशिक रेल्वेसाठी विराट जनआंदोलन; ९ ऑगस्ट रोजी महामार्गावर चक्काजाम आंदोलनाची हाक

पुणे, दि. ८ ऑगस्ट: पुणे–नाशिक रेल्वे प्रकल्पाच्या तातडीने अंमलबजावणीच्या मागणीसाठी ९ ऑगस्ट (क्रांती दिन) रोजी पुणे–नाशिक महामार्गावर विविध ठिकाणी विराट जनआंदोलन व चक्काजाम आंदोलन आयोजित करण्यात आल्याची माहिती पुणे–नाशिक रेल्वे कृती समितीने दिली आहे. उद्योग, शिक्षण, रोजगार, शेती, पर्यटन आणि सर्वसामान्य नागरिकांच्या दैनंदिन प्रवासाच्या दृष्टीने हा रेल्वे प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा असून, तो परिसराच्या सर्वांगीण विकासाचा महामार्ग ठरेल, असा समितीचा दावा आहे.

आंदोलनासाठी नागरिकांनी कुटुंबासह, मित्रपरिवारासह आणि परिसरातील नागरिकांना सोबत घेऊन मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

आंदोलनाची प्रमुख ठिकाणे

  • चाकण
  • नारायणगाव
  • चाळकवाडी टोलनाका
  • आळेफाटा
  • हिवरगाव पावसा टोलनाका
  • समृद्धी महामार्गाखाली, नांदुर शिंगोटे

पुणे–नाशिक रेल्वे कृती समिती (खेड, आंबेगाव, जुन्नर, अकोले, संगमनेर व सिन्नर) यांच्या वतीने हे आंदोलन आयोजित करण्यात आले असून, शिवप्रतिष्ठाण महाराष्ट्र राज्याचे संस्थापक व प्रदेशाध्यक्ष शिवश्री राहुल बाजीराव ढेंबरे पाटील यांनी नागरिकांना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

समितीच्या मते, “आपली रेल्वे, आपला हक्क, आपला विकास” या भूमिकेतून हे आंदोलन उभारण्यात येत असून, सरकारने पुणे–नाशिक रेल्वे प्रकल्पाबाबत तातडीने ठोस निर्णय घ्यावा, अशी प्रमुख मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे.

००००

close