shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

वाहेगांव शालेय व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्षपदी हिना अकबर बागवान यांची सर्वानुमते निवड

श्रीरामपूर / प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या पैठण तालुक्यातील वाहेगांव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,वाहेगांव शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी राधाकिसन बोबडे व उपाध्यक्षपदी हिना अकबर बागवान यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.


        शाळेच्या शैक्षणिक व सर्वांगीण विकासासाठी शाळा व्यवस्थापन समितीची महत्त्वपूर्ण भूमिका असते. विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे, शाळेतील विविध शैक्षणिक उपक्रमांना प्रोत्साहन मिळावे तसेच शाळेच्या भौतिक सुविधांमध्ये सुधारणा व्हावी, यासाठी समितीच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविण्यात येतात.
           याच पार्श्वभूमीवर झालेल्या बैठकीत राधाकिसन बोबडे व हिना अकबर बागवान यांची शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व उपाध्यक्षपदासाठी निवड करण्यात आली. 
त्यांच्या निवडीबद्दल शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी,सदस्य, शिक्षक, शिक्षीका, शालेय कर्मचारी वृंद, पालक, तसेच ग्रामस्थांसमवेत  ॲड.रफिक यासीन शेख उर्फ (ॲड.बाबाभाई शेख) ज्येष्ठ विधी तज्ञ पब्लिक नोटरी तालुका श्रीरामपूर, ॲड. शबाना रफिक बागवान पब्लिक नोटरी, अकबर अब्बास बागवान वाहेगांव ता. पैठण, युसुफभाई बागवान (ग्रामपंचायत सदस्य) खरवंडी कासार ता. पाथर्डी,जावेद बागवान, ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष हाजी फय्याज भाई बागवान, इब्राहिम बागवान, जाकीरभाई शहा, इकबाल इस्माईल काकर, ज्येष्ठ पत्रकार शौकतभाई शेख, हाजी शफिकभाई बागवान, बार असोसिएशनच्या माजी अध्यक्षा ॲड.मुमताज हारून बागवान, ॲड. हारून यासीन बागवान पब्लिक नोटरी श्रीरामपूर, खासदार गोविंदराव आदिक उर्दू हायस्कूल श्रीरामपूरच्या माजी शिक्षिका सायरा खाजाभाई बागवान, फ्रुट व्यापारी खाजाभाई बागवान आदींनी त्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
           शाळेच्या विकासासाठी आणि विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपण प्रामाणिकपणे कार्य करू, असा विश्वास नवनिर्वाचित उपाध्यक्षा हिना अकबर बागवान यांनी व्यक्त केला.
      त्यांच्या निवडीमुळे पालक व ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण असून, त्यांच्या माध्यमातून शाळेच्या विकासाला निश्चितच नवी दिशा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
वृत्त विशेष सहयोग
इब्राहीम बागवान (सर) श्रीरामपूर 

वृत्त प्रसिद्धी सहयोग
समता मीडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर - 9561174111
close