shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

शहा ग्लोबल स्कूलच्या विद्यार्थ्यांची श्री स्वामी समर्थ मंदिराला शैक्षणिक व सांस्कृतिक भेट

शहा ग्लोबल स्कूलच्या विद्यार्थ्यांची श्री स्वामी समर्थ मंदिराला शैक्षणिक व सांस्कृतिक भेट
इंदापूर : शहा ग्लोबल स्कूल, इंदापूर येथील प्री-प्रायमरी विभागातील विद्यार्थ्यांसाठी श्री स्वामी समर्थ मंदिराला शैक्षणिक व सांस्कृतिक भेटीचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये भारतीय संस्कृती, अध्यात्म, नैतिक मूल्ये आणि धार्मिक स्थळांविषयी आदरभाव निर्माण व्हावा हा या भेटीमागील मुख्य उद्देश होता.

मंदिरात विद्यार्थ्यांनी श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले तसेच प्रार्थना व श्लोक म्हणत आध्यात्मिक वातावरणाचा अनुभव घेतला. मंदिर प्रशासनाने सर्व विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे मनःपूर्वक स्वागत करून प्रेमपूर्वक अल्पोपहाराची व्यवस्था केली.

या प्रसंगी विद्यार्थ्यांना मंदिराचे महत्त्व, स्वच्छता, शिस्त आणि सामाजिक मूल्यांविषयी मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी अत्यंत आनंदाने व उत्साहाने या भेटीत सहभाग घेतला.

शहा ग्लोबल स्कूलतर्फे श्री स्वामी समर्थ मंदिराचे विश्वस्त, व्यवस्थापन आणि सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.
close