भिगवन येथे कृषिमंत्री ना दत्तात्रेय भरणे यांनी चालवला लाभार्थी शेतकऱ्याचा ट्रॅक्टर......
इंदापूर: दिनांक १/८/२०२६ रोजी व्यंकटेश लॉन्स भिगवन येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये कृषी विभागाने मा. कृषिमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्या हस्ते महाडीबीटी कृषी यांत्रिकीकरण योजनेतून अनुदानित मल्टी क्रॉप हार्वेस्टर व ट्रॅक्टरचे वितरण करण्यात आले.
यावेळी जनार्दन कोंडीबा साळुंखे मदनवाडी या शेतकऱ्याचा ट्रॅक्टर कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी स्वतः चालवून शेतकऱ्यांबरोबर मनमोकळेपणाने संवाद करून त्यांना शेतीमधील आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराबाबत प्रोत्साहित केले.
कृषी विभागाच्या योजनांमुळे शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावत आहे अशी जनार्दन कोंडीबा साळुंखे ,मदनवाडी यांनी प्रतिक्रिया देऊन कृषिमंत्री यांच्या कामाबाबत व कृषी विभागाच्या कामाबाबत समाधान व्यक्त केले.
तसेच तालुका कृषी अधिकारी इंदापूर दिपक गरगडे यांनी तयार केलेल्या "कृषी विभागाच्या योजनांची माहिती पुस्तिका" या पुस्तकाचे दत्तात्रय भरणे , कृषिमंत्री महाराष्ट्र राज्य त्यांच्या हस्ते विमोचन करण्यात आले.
तसेच यावेळी शेतकऱ्यांसाठी कृषी विभागाच्या स्टॉलमध्ये विविध फळे व भाजीपाला याचे प्रदर्शन ठेवण्यात आले होते.
यावेळी सर्व मंडल कृषी अधिकारी, सहाय्यक कृषी अधिकारी, उप कृषी अधिकारी उपस्थित होते.

