shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

कळसेश्वर विद्यालय कळस बु खो-खो चा 14 वर्ष वयोगट मुली संघ उपविजयी. .

अकोले प्रतिनिधी:
अकोले तालुका क्रीडा समितीच्या वतीने तालुकास्तरीय सांघिक क्रीडा स्पर्धेत  खो- खो क्रीडा प्रकारात कळसेश्वर विद्यालय कळस बु  खो-खो चा 14 वर्ष वयोगट मुलीचा संघ उपविजयी ठरला आहे.

    अभिनव पब्लिक स्कूल अकोले येथे आयोजित सांघिक क्रीडा स्पर्धा संपन्न झाल्या. यावेळी खो-खो क्रीडा स्पर्धेत 14 वर्ष वयोगट मुलींमध्ये कळसेश्वर विद्यालयाचा तालुक्यात दूसरा क्रमांक आला. अतितटीच्या अंतिम सामन्यात विद्यालयाने संघर्ष करून दूसरा क्रमांक पटकावला.  
      संघामध्ये खेळाडू म्हणून स्वराली वाकचौरे, अरुंधती कातोरे,  गौरी वाकचौरे, आदिती कर्पे ,गुंजन कातोरे, ईश्वरी उगले, गौरी साळुंके, ज्ञानदा वाकचौरे, श्रद्धा शिर्के, श्रेया शिर्के, ज्ञानेश्वरी कर्पे, अबोली वाकचौरे आदी विद्यार्थिनींनी यशस्वी कामगिरी केली. 
   या विद्यार्थ्यांना विद्यालयाचे मुख्याध्यापिका नंदा गोपाळे यांच्या प्रेरणेतून क्रीडा शिक्षक  शिवाजी आवारी, कुमार पालवे  यांच्या सह शिक्षक  मच्छिंद्र साळुंखे, गीतांजली खरबस, केशव महाले, मनीषा शिंदे, प्रशांत जाधव, प्रतीक्षा घुले यांचेही मार्गदर्शन लाभले.       
अगस्ती शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा सौ. शैलजा पोखरकर, कार्याध्यक्ष सतीश नाईकवाडी, शिरीष नाईकवाडी,शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष रामदास वाकचौरे, उपाध्यक्ष मनिषा बोऱ्हाडे व  सर्व सदस्य व सर्व ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे अभिनंदन केले.
close