shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

कळस बु. येथे १६ सप्टेंबरपासून अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन..,महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार व प्रवचनकार यांची उपस्थिती


 अकोले (प्रतिनिधी ):- तालुक्यातील धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचे मानलेले, अमृतवाहिनी प्रवरा मातेच्या तिरावर वसलेल्या श्रीक्षेत्र कळस बु., ता. अकोले येथे श्री कळसेश्वर कृपेने व परमपूज्य ब्रह्मलीन सुभाषपुरी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने अखंड हरिनाम सप्ताह तसेच श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायणाचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवार दि. १६ सप्टेंबर ते बुधवार दि. २३ सप्टेंबर २०२६ या कालावधीत हा धार्मिक सोहळा भक्तिमय वातावरणात पार पडणार आहे.

          गणेशोत्सवाच्या पावन पर्व काळात ऋषीपंचमी ते वामन जयंती या तिथीनुसार संपन्न होणाऱ्या या सप्ताहामध्ये महाराष्टातील नामवंत प्रवचनकार व कीर्तनकारांची उपस्थिती असून अनुक्रमे पुढील प्रमाणे बुधवार दि. १६ सप्टेंबर रोजी ह.भ.प. संस्कृतीताई वाकचौरे, कळसकर  व कळसेश्वर देवस्थान ट्रस्ट चे विश्वस्त ह.भ.प. देवराम महाराज वाकचौरे (सर),  गुरुवार दि. १७ रोजी ह.भ.प. रोहिणीताई गडकरी व वारकरी भूषण ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज कदम, छोटे माऊली,  शुक्रवार दि. १८ रोजी ध्येयपूर्ती वारकरी शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा ह.भ.प. सुनिताताई कातोरे व ह.भ.प. महादेव महाराज राऊत, शनिवार दि. १९ रोजी कळस वारकरी भूषण ह.भ.प. अरुण महाराज शिर्के व कोतुळेश्वर वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ह.भ.प. नितीन महाराज गोडसे, रविवार दि. २० रोजी अगस्ती देवस्थान ट्रस्ट चे विश्वस्त ह.भ.प. दीपक महाराज देशमुख व गाथा वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यापक ह.भ.प. वैभव महाराज राक्षे, सोमवार दि. २१ रोजी अगस्ती देवस्थान ट्रस्ट चे विश्वस्त ह.भ.प. गणेश महाराज वाकचौरे व भागवताचार्य ह.भ.प. अशोक महाराज ईगल शास्त्री, तर मंगळवार दि. २२ रोजी अगस्ती देवस्थान ट्रस्ट चे माजी विश्वस्त ह.भ.प. विष्णूपंत महाराज वाकचौरे व वारकरीरत्न ह.भ.प. चैतन्य महाराज निंबोळे यांचे तर  बुधवार दि. २३ सप्टेंबर रोजी सकाळी ९ ते ११ वाजता काल्याचे कीर्तन ह.भ.प. कीर्तनकेसरी देविदास महाराज निवळीकर (जालना) यांचे होणार आहे.
      या सप्ताहात ज्ञानेश्वरी पारायण व्यासपीठ चालक हभप हरिश्चंद्र महाराज वाकचौरे सर तर गायक म्हणून ह भ प किरण महाराज शेटे, अनिल महाराज रुपवते, प्रवीण महाराज पांडे तर मृदंगाचार्य संगीत विशारद ह भ प संकेत महाराज आरोटे हे राहणार असून हरिपाठ व काकडा भजन कळसेश्वर भजनी मंडळ कळस बुद्रुक व कळस खुर्द हे करणार आहे तरी  परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून धार्मिक कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन समस्त ग्रामस्थ व तरुण मित्र मंडळ, कळस बु. यांच्या वतीने करण्यात आले आहे.
०००
close