shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत नंदिकेश्वर मंदिर परिसर:एकदिवसीय स्वच्छता अभियान

राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत नंदिकेश्वर मंदिर परिसर:एकदिवसीय स्वच्छता अभियान 

कळंब (ता. इंदापूर) : विश्वासराव रणसिंग महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागाच्या वतीने मौजे दगडवाडी येथील नंदिकेश्वर मंदीर येथे एकदिवसीय स्वच्छता अभियान उत्साहात राबविण्यात आले. मंदिर परिसरात शेवटच्या श्रावणी सोमवार निमित्त आयोजित केलेल्या यात्रे मुळे मंदिर परिसरा मधे झालेला कचरा, प्लास्टिक पिशव्या,पाण्याच्या बॉटल तसेच घन कचऱ्याचे या अभियानामध्ये NSS स्वयंसेवकांनी निर्मूलन केले.
 स्वच्छता ही केवळ शासनाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाची सामाजिक जबाबदारी आहे, हा संदेश विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष कृतीतून दिला. अभियानादरम्यान विद्यार्थ्यांनी ‘स्वच्छ परिसर–सुंदर परिसर’ तसेच प्लास्टिकमुक्त परिसराचा संदेश दिला.
 या उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून श्रमदान केले. परिसरातील अस्वच्छता दूर करून पर्यावरण संवर्धन, स्वच्छता आणि सामाजिक बांधिलकी याबाबत जनजागृती करण्यात आली.
  हा उपक्रम इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठानचे सचिव मा. विरसिंह रणसिंग यांच्या मार्गदर्शनाने पार पडला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक काळंगे , NSS कार्यक्रम अधिकारी प्रा.राजेंद्रकुमार डांगे व डॉ. तेजश्री हुंबे तसेच प्रा.नितीन रूपनवर, प्रा.अपेक्षा मेटकरी,प्रा.अमर नांदगुडे व प्रा.सचिन पवार  उपस्थित होते. राष्ट्रीय सेवा योजनच्या ५० स्वयंसेवक यांच्या सहभागातून हे अभियान यशस्वीरीत्या पार पडले. विद्यार्थ्यांच्या सहभागामुळे स्वच्छतेसोबतच ‘स्वच्छता हीच सेवा’ हा सामाजिक संदेश प्रभावीपणे पोहोचला.
close