*इंदापूर नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष पांडुरंग जगताप यांना वाढदिवसानिमित्त हर्षवर्धन पाटील यांनी दिल्या शुभेच्छा*
इंदापूर-इंदापूर नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष पांडुरंग कृष्णाजी जगताप यांच्या ८२ व्या वाढदिवसानिमित्त माजी मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी त्यांच्या घरी जाऊन यथोचित सत्कार करून शुभेच्छा दिल्या.
यावेळी नगरसेवक कैलास कदम, भाजप शहराध्यक्ष शकीलभाई सय्यद, ललेंद्र शिंदे, गणेश जगताप, राजेश शुक्ल, राजू जगताप, सुनील गलांडे, सचिन जगताप, राहुल जौंजाळ,सचिन जामदार उपस्थित होते.
हर्षवर्धन पाटील यांनी त्यांच्याशी संवाद साधून जुन्या आठवणी आणि सद्य परिस्थितीवर चर्चा करीत त्यांना दीर्घायुष्याच्या शुभेच्छा दिल्या.
पांडुरंग जगताप यांनी देखील आनंद व्यक्त करीत हर्षवर्धन पाटील यांचे आभार मानले.