प्रतिनिधी : संजय वायकर
चिचोंडी पाटील : 16 / चिचोंडी पाटील सेवा सहकारी संस्थेच्या वतीने सभासदांना दिवाळीच्या पार्श्वभूमीवर आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये झालेल्या नफ्यातून 12% लाभांशचे वाटप पंचायत समितीचे मा.सभापती इंजि.प्रविण कोकाटे मा.सरपंच राजूशेठ हजारे व मा.सरपंच शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शिक्षक नेते आबासाहेब कोकाटे सर होते.संस्थेच्या वतीने सभासदांना दिवाळी भेट म्हणून एकूण 9 लक्ष 25 हजार रुपये रकमेचे लाभांश वाटप करण्यात आले.या निर्णयाचे सभासदांनी स्वागत केले व संस्थेचे चेअरमन व संचालक मंडळ यांचे ग्रामस्थांतर्फे आभार व्यक्त करण्यात आले.
चिचोंडी पाटील सेवा सहकारी संस्था कायमच सभासद हिताचे निर्णय घेत असते व सोसायटी शेतकऱ्यांना न्याय देण्यास समर्थ असल्याचे प्रतिपादन यावेळी मा.सभापती प्रविण कोकाटे यांनी केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष आबासाहेब कोकाटे यांनी यावेळी बोलताना सांगितले की सभासदांनी घेतलेले कर्ज वेळेवर परतफेड केले तरच संस्थेस नफा होतो व त्यामुळेच लाभांश वाटप करणे शक्य होते.
यावेळी कामधेनू पतसंस्थेचे चेअरमन डॉ.ययाती फिसके,मा.सरपंच मच्छिंद्र खडके,सोसायटी चेअरमन महादेव खडके,व्हाईस चेअरमन डॉ.मारुती ससे,अंबादास फिसके,संदीप कोकाटे, दिलीप पवार,पंडित कोकाटे,विठ्ठल देवा कोकाटे,बबन कोकाटे,सुरेश ठोंबरे,महेश पाटील जगताप, कासमशेठ सय्यद,काशिनाथ बेल्हेकर, चंद्रकांत सदाफुले,अर्जुन वाडेकर, काशिनाथ वाडेकर,सचिव दत्ता झांबरे, रघुनाथ कोकाटे,तात्या देवकर, रावसाहेब कोकाटे,अब्बास पठाण गुरुजी,शेषराव ठोंबरे,अनिल कोकाटे, प्रशांत लबडे,जगन्नाथ ठोंबरे,कल्याण कोकाटे,खंडू मांढरे, पोपट कोकाटे,शंकर देशमाने, तुळशीराम कोकाटे,संजय कोकाटे, संजय दानवे,बाबासाहेब काळे आदींसह शेतकरी सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.