मुंबई : दिनांक १६ आक्टोबर २०२२:-
वैशाली ठक्करने अल्प कालावधीत टि.व्ही. इंडस्ट्रीमध्ये नावलौकिक मिळविले होते. अनेक प्रसिद्ध मालिकांमध्ये तिने हटके काम केलेलं आहे.
टीव्ही इंडस्ट्रीमधून मन हेलावणारी बातमी समोर येत आहे. अभिनेत्री वैशाली ठक्करने (vaishali takkar) आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे.
'ये रिश्ता क्या कहलाता है' (Yeh rishta kya kehlata hai) या मालिकेत वैशालीने महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती.
याप्रकरणी पोलिसांचा तपास सुरू असून घटनास्थळावरून पोलिसांना एक सुसाई़ड नोटही सापडलेली आहे. वैशाली ठक्कर एकवर्षापासून इंदूरमध्ये राहत होती. तिथेच राहत्या घरी गळफास लावून तिने आत्महत्या केल्याचे आढळून आले. तेजाजीनगर पोलिसांनी या प्रकरणी तातडीने तपास सुरू केला आहे. महत्त्वाचं म्हणजे घटनास्थळावरून पोलिसांना सुसाईड नोटही सापडलेली आहे. प्राथमिक तपासात प्रेमप्रकरणातून आत्महत्या केल्याचं सांगण्यात येत आहे.
आत्महत्येच्या बातमीने कुटुंब आणि चाहत्यांना बसला धक्का..!
वैशालीच्या आत्महत्येची बातमी समजताच तिच्या कुटुंबीयांना व चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. तसेच टीव्ही इंडस्ट्रीतील कलाकारांनीही या घटनेबद्दल
सोशल मीडियाच्या माध्यमातून शोक व्यक्त केला आहे.
वैशालीच्या जाण्याने तिचे चाहते दु:ख व्यक्त करत आहेत. मात्र, थेट आत्महत्या करण्याचं पाऊल वैशालीने का उचललं हा एकच प्रश्न तिच्या चाहत्यांना सतावतोय. आयुष्यात इतकं कोणतं असं मोठं दु:ख होतं की वैशालीला आयुष्य संपवावसं वाटलं..
वैशालीच्या आत्महत्येचं नेमक आणि खरं कारण काय ते पोलीस तपासातच उघड होईल. घटस्थळावर सापडलेल्या सुसाईड नोटमध्ये नक्की काय लिहिलेलं आहे ते लवकरच समोर येईल.
वैशालीने एका महिन्यातच साखरपुडा मोडला होता..?
वैशालीचे गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात साखरपुडा केला होता. तिने तिच्या रोका सोहळ्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत चाहत्यांना ही खुशखबरही दिली होती. कुटुंबीय आणि जवळच्या मित्रमैत्रिणींच्या उपस्थितीत वैशालीचा साखरपुडा झाला होता. मात्र, साखरपुड्यानंतरअवघ्या एका महिन्यातच तिने साखरपुडा मोडला आणि लग्न करत नसल्याचे स्पष्ट केलं. लग्न मोडल्यानंतर सोशल मीडियावरील रोकाचा व्हिडिओसुद्धा वैशालीने डिलीट केला.
वैशाली ठक्करची कारकीर्द..
वैशाली ठक्करने हिंदी स्मॉल स्क्रीनवरील 'सुसराल सिमर का' आणि 'ये रिश्ता क्या कहलाता है' या गाजलेल्या मालिकांमध्ये काम केलेलं आहे. 'ससुराल सिमर का' या मालिकेत वैशालीने अंजली भारद्वाज ही व्यक्तीरेखा साकारली होती तर 'ये रिश्ता क्या कहलाता है' या मालिकेत संजनाची भूमिका तिने बजावली होती.
ही घटना तिच्या चाहत्यांना खुप दुःख दायक घटना वाटत आहे.