shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

नवरात्र उत्सवानिमित्त जय भवानी मित्र मंडळ वडापुरी आयोजित निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांचे हरी किर्तन संपन्न.

ज्याचा पाया ज्ञान आहे. त्याचा कळस वैराग्य आहे .ज्याचा कळस वैराग्य आहे .त्याचा विस्तार नाम आहे. ज्याचा विस्तार नाम आहे .त्याचा शांती खांब आहे .ज्याचा शांती खांब आहे त्याचे नाव वारकरी संप्रदाय आहे.- निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर.

नवरात्र उत्सवानिमित्त जय भवानी मित्र मंडळ वडापुरी आयोजित निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांचे हरी किर्तन संपन्न.
इंदापूर प्रतिनिधी:वारकरी संप्रदायाचा पाया ज्ञानदेव ,कळस तुकाराम, विस्तार नामदेव आणि खांब एकनाथ महाराज आहेत.ज्याचा पाया ज्ञान आहे. त्याचा कळस वैराग्य आहे .ज्याचा कळस वैराग्य आहे .त्याचा विस्तार नाम आहे. त्याचा विस्तार नाम आहे .त्याचा शांती खांब आहे .ज्याचा शांती खांब आहे त्याचे नाव वारकरी संप्रदाय आहे. असे उद्गार निवृत्ती देशमुख महाराज यांनी वडापुरी येथील जय भवानी तरुण मित्र मंडळ यांनी आयोजित केलेल्या कीर्तनामध्ये काढले.

जय भवानी तरुण मित्र मंडळ नवरात्र उस्तव निमिताने शुक्रवार दिनांक १४ ऑक्टोबर २०२२ रोजी निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर याचे किर्तन सोहळा  पार पडला. 
यावेळी मंडळाच्या वतीने खूप छान नियोजन करण्यात आलेले होते.  महिला व पुरुषा साठी स्वतंत्र पक्षाची व्यवस्था करण्यात आली होती.
या सोहळ्याच्या नियोजनासाठी गेली ८ दिवस मंडळाच्या कार्यकर्त्यांनी घेतलेली मेहनत ,सातत्याने पडणारा पाऊस या सर्वावर मात करून सुंदर अतिशय सुनियोजित नियोजन मंडळाने केल्याने वडापुरी पंचक्रोशीतील व  
तालुक्यातून विविध ठिकाणाहू आलेले, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातून मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती व ग्रामस्थ यांनी भक्तीमय स्वरूपात कीर्तनाचा आनंद घेतला .
या कीर्तन सोहळ्यासाठी सातुभाऊ सुभास थोरात यांचे सौजन्य प्राप्त झाले.मंडळाच्या सर्वच कार्यकात्यांनी मोठया उत्सहाणे सहभाग दाखवला.
close